You are currently viewing मृदगंध मृत्तीकेचा

मृदगंध मृत्तीकेचा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मृदगंध मृत्तीकेचा*

〰️〰️〰️〰️〰️〰️

क्षणक्षण झेलता झेलता

केवळ मी आनंद मानला….

 

सुखदा असो की दुःखदा

अथांग शांतसागर पाहिला….

 

उमलत्या कळ्याफुलांचा

अगम्य , सोहळा पाहिला….

 

निर्माल्याही असते वेदना

हा दृष्टांत , मज जाणवला….

 

अंती , मृत्तिकेचाच मृदगंध

विसावता भावतो अंतराला….

 

प्रवास जन्ममृत्यूचाच खेळ

अंती , मातीत विसावलेला….

 

तीच एक शाश्वत मोक्षमुक्ती

कृतार्थ , करते या जीवनाला….

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

*रचना क्र.१३७ / ७ / ७ / २०२४*

*#©️वि.ग.सातपुते.( भावकवी )*

*📞( 9766544908 )*

प्रतिक्रिया व्यक्त करा