You are currently viewing ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

 इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील (भटक्या जमाती – (क) प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून) उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” राबविण्यास इतर मागास बहूजन कल्याण विभागाकडून मान्यता देण्यात आली असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण सहाय्यक संचालक तथा सदस्य सचिव संतोष चिकणे यांनी दिली आहे.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेकरीता पुढीलप्रमाणे नमूद वेळात्रकानुसार सहाय्यक संचालक इतर मागास बहूजन कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग येथे अर्ज वाटप व स्विकृती करण्यात येणार आहे.  उच्च  शिक्षणाचे व्दितीय, तृतीय, चतुर्थ वर्ष अर्ज स्वीकारण्याची शेवटचा दिनांक 15 जूलै 2024 पर्यंत, उच्च शिक्षणाचे प्रथम वर्ष अर्ज स्वीकारण्याची शेवटचा दिनांक 20  ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज सादर करावीत. येथे अर्ज सादर करावीत.

            ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंचे वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबविताना  VJNT/OBC/SBC (भटक्या जमाती-(क) प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून) विद्‌यार्थ्यांना आपल्या स्तरावरुन योजनेची माहिती सांगुन प्रचार व प्रसिध्दी करण्यात यावी तसेच आपल्या महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डावर दर्शनी भागात योजनेची नोटीस लावण्यात यावी. तसेच विद्यार्थ्यांनमध्ये जनजागृती होवून अर्ज ऑफलाईन पध्दतीने मागविण्यात येत असल्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक तथा सदस्य सचिव संतोष चिकणे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा