राजकुमारी फुल
गडद जांभळ्या तुझ्या पाकळ्या,
छटा गुलाबी शोभे अंतरी.
नाजूक शुभ्र पुंकेसर ते,
जणू सांडती किरणे भूवरी.
हिरवी हिरवी नाजूक पाने,
रेषा त्यावर शोभुनी दिसती.
गलका तो असंख्य पानांचा,
एकमेकांस भेटताच हसती.
सोनेरी कांडी सारख्याच फांद्या,
भार तयांचा अलगद पेलती.
गुलसर कोवळ्या कळ्या जांभळ्या
मन आनंदे फांदीवर डोलती.
झुपकेदार ते तुझे वाढणे,
ऐट तोऱ्याची ना कमी भासे.
खुशालचेंडू ते तुझे वागणे,
बारामासही बहर तुलाच दिसे.
बहर तुलाच दिसे…!!
(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६