You are currently viewing लोकशाहीत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची – विशाल परब

लोकशाहीत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची – विशाल परब

सावंतवाडी / प्रतिनिधी :

 

माध्यमे ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ तर पत्रकार हा त्या समाजाचा आरसा असतो, जो प्रतिकूल परिस्थितीत केवळ सत्य प्रगट करत आपली बाजू मांडतो. त्यामुळे लोकशाहीत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी व्हॉइस ऑफ मिडिया आयोजित गुणगौरव कौतुक सोहळ्याप्रसंगी केले.

व्हॉइस ऑफ मीडिया, सिंधुदुर्ग आयोजित पत्रकारांच्या पाल्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रम प्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब बोलत होते. निष्पक्षपणे कोणत्याही विषयातील सत्य समोर आणत योग्य न्याय देण्याचा प्रयत्न पत्रकारितेच्या माध्यमातून होत असतो, आणि या कार्यात पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. सत्याची कास धरण्यासाठी निर्भीडपणे कार्य करणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष सदैव उभा आहे आणि यापुढेही राहील.

कार्यक्रमास राज्याचे मंत्री दीपकजी केसरकर, माजी आमदार राजनजी तेली, माजी नगरसेवक आनंद नेवगी, अर्चनाताई घारे परब, दिनेश गुप्ता, व्हॉइस ऑफ मीडियाचे कार्याध्यक्ष समीर महाडेश्वर, जिल्हा अध्यक्ष परेश राउळ, कार्याध्यक्ष तुषार रसाळ, सल्लागार डॉ.बी.एन.खरात, दिलिप भालेकर, केतन आजगावकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा