You are currently viewing भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात ” मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण ” योजनेचे मोफत फाॅर्म वाटप

भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात ” मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण ” योजनेचे मोफत फाॅर्म वाटप

*भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात ” मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण ” योजनेचे मोफत फाॅर्म वाटप*

वेंगुर्ले

” मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण ” ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सरकार बरोबर भाजपानेही यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे . ही योजना सर्व समाजातील शेवटच्या महीला पर्यंत पोहचण्यासाठी भाजपा च्या माध्यमातून मोफत फाॅर्म वितरित करण्यात आले .
यावेळी उपस्थित महीलांना मार्गदर्शन करताना जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई म्हणाले कि राज्यातील महायुती सरकारने महिला भगिंनींसाठी अनेक चांगले निर्णय घेतले .महीलांना एस्.टी.मध्ये सवलत दिली , मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने मार्फत महिलांना मोफत गॅस चे वाटप होणार आहे . तसेच राज्यातील मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत दिले जाणार आहे . त्यामुळे पदवी व पदविका शिक्षण घेणाऱ्या सर्वच विद्यार्थिनींना मोफत उच्चशिक्षण मिळणार आहे. सर्वच जाती – धर्माच्या मुलींना या माध्यमातून मोफत शिक्षण मिळणार आहे . तसेच घरात जन्म घेणाऱ्या मुलींसाठी ” माझी कन्या भाग्यश्री ” या योजनेत वयाच्या १८ व्या वर्षानंतर मुलींच्या नावे १ लाख रुपये मिळणार आहेत .
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजना वेंगुर्ले तालुक्यात शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी गावा गावात भाजपा च्या माध्यमातून कॅम्प आयोजित करुन पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले .
वेंगुर्ले भाजपा तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , मा.नगराध्यक्ष राजन गिरप , महीला मोर्चा अध्यक्षा सुजाता पडवळ , महीला जिल्हा उपाध्यक्ष वृंदा गवंडळकर , जि.का.का.सदस्य स्मिता दामले , महीला शहर अध्यक्षा श्रेया मयेकर , नगरसेविका कृपा मोंडकर , बुथ प्रमुख निलेश गवस व अजित कनयाळ्कर , ओबीसी सेल चे शरद मेस्त्री , ता.चिटणीस समीर कुडाळकर , शक्तिकेंद्र प्रमुख सुधीर गावडे , बुथ प्रमुख बाळकृष्ण येरम , युवा मोर्चाचे प्रथमेश यंदे , कार्यालय प्रमुख छोटु कुबल उपस्थित होते .
यावेळी वेंगुर्ले शहरातील बहुसंख्य महिलांनी फाॅर्म वितरणाचा लाभ घेतला .

प्रतिक्रिया व्यक्त करा