You are currently viewing धरणीची माया

धरणीची माया

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

सहाक्षरी

*धरणीची माया*

 

रानात उन्हात

रापलेली काया

आईच्या पोटीच

धरणीची माया….

 

उपाशी राहून

घास देते ओठी

काळजी भुकेची

चिल्यापिल्यांसाठी……

 

पदरात तिच्या

देते ती निवारा

संसार करते

देवाचा आसरा…

 

वाहे जग चिंता

काळी आई मोठी

सृजन घडवी

प्राणिमात्रांसाठी…

 

पोटात बियाणं

घेते रुजवून

उन्हं वा-यासंगे

येते बहरून…

 

उपकार किती

आईच्या मायेचे

वात्सल्य पाझरे

अतीव दोघींचे…..!!

 

॰॰॰○॰॰॰○॰॰॰○॰॰॰○॰॰॰○॰॰॰

अरुणा दुद्दलवार @✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा