*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*’पाऊस एक कप चहा आणि ती’*
पाऊस एक चहा आणि ती
हे नातं फक्त पावसाळ्यातच बहराचे
पावसात भिजनं तिला खूप आवडायचे
पाऊस आला की
ती धावतच जायची
चिंब चिंब भिजायची
भिजवून आल्यावर
माझ्या कापातला
अर्धा चहा प्यायची
आणि पुन्हा पावसात जाऊन
सरींनी कवेत घ्यायची
मी खिडकीत बसून फक्त
तिलाच बघत रहायचो
तिच्यासाठी पावसाची
गाणी म्हणायचो
टिप टिप बरसा पाणी
पानी में आग लगायी
आग लगी दिलं मे तो
दिल को तेरी याद
असंच काही तरी
पाऊस फक्त तिच्यासाठी यायचा
आला की तिला आनंद व्हायचा
हे असं प्रत्येक वर्षी चालायचं
ती जवळ आली की
कळायचं नाही मला
मी काय बोलायचं
ती मात्र हलकासा कटाक्ष टाकायची
पाऊस गेल्यावर निघून जायची
मी गरम गरम चहा पित रहायचो
तिच्यासाठी गाणं म्हणायचो
मेघा रे मेघा रे मत प्रदेश जारे
आज तू प्रेम का संदेश बरसारे
असंच काही तरी
प्रेत्येक पावसाळ्यात ती भिजायची
माझ्या कपातला चहा प्यायची
पाऊस एक कप चहा आणि ती
हे नातं फक्त पावसाळ्यातच बहराच
तिचं माझ्या जवळ येण हे
तात्पुरता असायचं
पाऊस गेला की ती
नजरेआड व्हायची
जाता जाता मागे वळून बघायची
मी मात्र चहाचा घोट घेत घेत
तिला खिडकीतून बघतं रहायचो
आणि तिच्यासाठी पावसाचं गाणं म्हणायचो
रिमझिम गिरे सावन
सुलग सुलग जाये मन
भीगे आज इस मोसम में
लगे कैसी ये अगन
असंच काही तरी
*संजय धनगव्हाळ*
*अर्थात कुसुमाई*
९४२२८९२६१८
९५७९११३५४७