You are currently viewing उर्दू गजलांच्या प्रेमात रंगले रसिक

उर्दू गजलांच्या प्रेमात रंगले रसिक

*उर्दू गजलांच्या प्रेमात रंगले रसिक*

पिंपरी

स्वरा म्युझिकल आयोजित आणि साज पुणे प्रस्तुत ‘ये इश्क नहीं आसां’ या गजल गायन मैफिलीत लोकप्रिय शायरांच्या गजल पारंपरिक पध्दतीने सादर झाल्या. निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह (छोटे सभागृह) येथे गुरुवार, दिनांक ०४ जुलै २०२४ रोजी सादर करण्यात आलेल्या उर्दू गजलांच्या मैफलीतील शृंगाररसात रसिक रंगून गेले. डॉ. शशिकला शिरगोपीकर, कुमार करंदीकर, श्रुती करंदीकर आणि गायत्री सप्रे – ढवळे या गायक कलाकारांनी अभिजात शास्त्रीय संगीतातील रागांवर आधारित या उर्दू गजलांचे सुरेल सादरीकरण करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. “रंज की जब गुफ्तुगू होने लगी…” (दाग दहेलवी), “कभी कहा ना किसीसे तेरे फसाने की…” (कमर जलालाबादी), “छुपाऊ लाख राज – ए – इश्क…” (शमीम जयपुरी), “कू – ब – कू फैल गयी बात…” (परवीन शाकिर), “कही चांद राहों में… (बशीर बद्र), “इक लफ्ज – ए – मोहब्बत का… (जिगर मुरादाबादी), “कभी मुझको साथ लेकर…” (अहसान दानिश), “वो जो हम में तुम में करार था…” (मोमिन), “मिलना था इत्तेफाक…” (अंजुम रहबर), “काम आ सकी ना अपनी वफाए …” (अख्तर शिरानी) अशा एकाहून एक सरस गजलांमधून प्रेमिकांमधील ओढ, प्रेमाचे संकेत, प्रतीक्षा, मिलन, विरह, ताटातूट अशा संमिश्र भावभावनांची उत्कट अनुभूती श्रोत्यांना मिळाली. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या मैफलीचा समारोप “दिल लगाने की किसीसे वो सजा पायी की बस…” या शमीम जयपुरी यांच्या रसिकप्रिय गजलेने करण्यात आला.

महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांच्या प्रमुख उपस्थितीसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या मैफलीचा श्रवणानंद घेतला. अरुण गवई आणि डॉ. सतीश गोरे यांनी तबला आणि गिटारची नेटकी साथसंगत केली; तर स्नेहल दामले यांनी खुमासदार निवेदनाने श्रोत्यांची दाद मिळवली.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

______________________________
*संवाद मीडिया*जाहिरात

*प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…….*

*शैक्षणिक वर्ष 2024-2025*

*संपूर्ण कोकणात गेली 20 वर्षे नर्सिंग क्षेत्रात काम करण्याचाअनुभव असलेल्या*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ नर्सिंग, दापोली.*

*(MSBNPE,INC,MNC व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त)* मध्ये नर्सिंग करण्याची सुवर्ण संधी

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2024-2025*

🔸 *कोर्सचेनांव-
*जनरल नर्सिंग मिडवाइफरी (GNM)*
Eligibility- 12th Pass Any Stream
• Duration : 3 Years

*ऑक्सीलियरी नर्सिंग मिडवाइफरी(ANM)* • Eligibility- 12th Pass
Any Stream
• Duration : 2 years

*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(*शासन नियमानुसार).*
*संधी* –
🔸संपूर्ण महाराष्ट्रातील मोठ्या शहरात शासकीय व खाजगी हॉस्पिटलमध्ये 100% नोकरीची संधी उपलब्ध.

*आपला प्रवेश लवकरच निश्चित करा.*
👉🏻 *संपर्क* –
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712
*संपर्क:*
*9145623747*
*9420156771*
*7887561247*

*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा