‘लाडकी बहीण’ योजनेसाठी सावंतवाडी नगरपालिकेकडून कक्ष स्थापन…
सावंतवाडी
शासनाची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राबवण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेकडून महिला लाभार्थ्यांसाठी ऑनलाईन, ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सोमवार ८ जुलै पासून सावंतवाडी शहरातील महिला या केंद्रावर अर्ज सादर करू शकतात. तरी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरीता सावंतवाडी शहरातील पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी श्री.सागर साळुंखे यांनी केले आहे.