You are currently viewing “क्षेत्र पंढरपूर”

“क्षेत्र पंढरपूर”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”क्षेत्र पंढरपूर”*

 

पंढरपूर जगांतील श्रेष्ठ तीर्थ स्थान

पुंडलिकाने ठेवले विठूस उभे करून।।धृ।।

 

अमोल खजिना दिधला पुंडलिक धन्य

पृथ्वीवरील वैकुंठ दिधले आंदण

दाविले विष्णुपद सर्वांना पुंडलिकानं।।1।।

 

गया रामेश्वर काशी सर्व विठ्ठल चरण

सर्व देव पंढरीत शाश्वत संत जन

घेता विठू दर्शन अहंकार जाई गळून।।2।।

 

वारीत सर्व जाती सुखदुःख विसरून

नाचती आनंदे गळाभेटी घेत रिंगण

पंढरीत जाणवे कणाकणांत स्पंदन।।3।।

 

भीमा चंद्रभागा स्नाने पापे जाती जळून

पंढरीत चाले अखंड नाम संकिर्तन

विठुराया प्रार्थीतो मिळावे आशीर्वचन।।4।।

 

श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677

प्रतिक्रिया व्यक्त करा