भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची शिवसेनेवर घणाघाती टीका
कणकवली
चिपी विमानतळाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेची गेली सहा वर्ष सत्ता आहे. शिवसेनेचे दोन दोन पालकमंत्री झाले. उद्योगमंत्री, खासदार, आमदार गेल्या सहा वर्षात शिवसेनेचे असतांना हे विमानतळ सुरू का करु शकले नाहीत ? हे त्यांचे अपयश आहे. प्रथम या विमानतळासाठी रस्ते, वीज, पाणी आदी आवश्यक सुविधा द्या आणि मग श्रेय घेण्यासाठी फोटोसेशन करा, अशी घणाघाती टीका भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली. कणकवली येथील भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकर परिषदेत ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, माजी मंत्री सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून चिपी विमानतळ सुरु झाले. मात्र उर्वरित काम शिवसेनेचे सत्ताधारी पूर्ण करु शकले नाही.सेनेचे दोन पालकमंत्री होऊन गेले.मात्र या विमानतळावर गणपती उतरण्यापलीकडे काही केले नाही.लोकांची किती दिवसफसवणूक करणार ? असा संतप्त सवाल राजन तेली यांनी केला. चिपी विमानतळ कायम सुरु व्हावा, यासाठी राज्य सरकार आणि सेना नेत्यांचे हात कोणी बांधले आहे काय ? रोज भेटी देता फोटो मीडिया करता मात्र व्यवस्था का करत नाही.माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे यांच्या सोबत अधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यावेळी आवश्यक त्या सूचना त्यांनी दिल्या.चिपी विमानतळ कंपनीचे डायरेक्टरशी चर्चा केली. रस्त्यासाठी लागणार निधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यानाच्या कडून देण्याचे ठरले.स्वतःचा खासदार फंड ते देत आहेत असे असतांना शिवसेना काय करते याचे उत्तर द्यावे. भेटी देऊन प्रश्न सुटत नाही तर ते सोडविण्यासाठी निर्णय घ्यावे लागतात, ते या सरकार मध्ये आणि मंत्री, पदाधिकारी यांच्यात ताळमेळ नसल्याने जनतेचे प्रश्न सुटत नाहीत अशी टीका श्री.तेली यांनी केली. विमानतळ सुरु होणार असे सांगून नोकरीचे अर्ज भरून घेतले आहेत. ते धूळखात पडले आहे,ही अशी फसवणूक सुरु आहे.हे किती दिवस चालणार ? मोपा विमानतळ लवकरच सुरू होणार आहे. त्यापूर्वी सर्व सुविधांनी पूर्ण आपले चिपी विमानतळ सुरू झाले पाहिजे.श्रेयाचे राजकारण करण्यापेक्षा चिपी विमानतळ सुरू व्हावे आणि त्या ठिकाणचे प्रश्न सुटावेत यासाठी प्रयत्न करा. वॉटर स्पोर्ट बंद असून सरकार मध्ये असलेले नेते निष्क्रिय ठरले म्हणून अजून परवानगी मिळत नाही.चीफ सेक्रेटरी सोबत माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे बोलले मात्र मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कडे ही परवानगीची फाईल्स गेले आहे. किती दिवस हे असे चालणार कधीतरी जबाबदारी म्हणून प्रश्न सोडवा,अशी मागणी राजन तेली यांनी केली. मच्छिमार पॉकेज मध्ये कुटूंबातील एकालाच लाभ देणार अशी जाचक अट घालून मच्छिमार लोकांनची फसवणूक केली आहे. चक्रीवादळ, भातशेती नुकसान अद्याप नाही.ही शेतकऱ्यांची फसकमवणूक आहे. कुडाळ मधील महिला व्हॅस्पिटल आधी पूर्ण करा.मग मेडिकल कॉलेज करा. छोट्या छोट्या गोष्टी करू शकत नाही तर या व्हस्पिटल साठी हजार कोटी कुठून देणार ? त्यामुळे लोकांचा शिवसेना आणि आघाडी सरकारवर विश्वास राहिला नाही. ६० पेक्षा जास्त ग्रामपंचायत भाजपा च्याच असतील असा विश्वास यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांनी केला.