पुणे :
राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती निमित्त, ‘वाचन छंद प्रेमी’ साहित्य समूह आयोजित, सदर उपक्रमात महाराष्ट्र सह इतर राज्यातील नामांकित साहित्यिकांनी ‘छत्रपती शाहू महाराज’ विषयावर विविधांगी लेखन करून भरघोस प्रतिसाद दिला.
वाचन छंद प्रेमी’ साहित्य समूह आयोजित, ‘शाहू महाराज’ विषयावर, दिपककुमार सरदार, कवियत्री स्वाती कुळकर्णी, प्रा. पी. एस. बनसोडे , डॉ. अशोक शिरसाट अकोला,मा.जिते़द्र आमटे, मा. राजू करकरनूर यासह, साहित्यिक नं.भा.कोहळे, सौ. स्नेहा मुकंद शिंपी, कवियत्री,उज्ज्वला कोल्हे आदी साहित्यिक,लेखक कवीनी उपक्रमात सहभाग घेत,सदर विषयावर दर्जेदार काव्य लेखन केले. परिक्षक मनोहर पवार केळवदकर यांनी निरपेक्ष परिक्षण केले.
ग्राफिक्सकार मा.जे.नारायन सर यांनी, अप्रतिम सन्मान पत्र बनवून उपक्रमाची शोभा वाढवली. यावेळी नुकतेच समूह तर्फे सर्व सहभाग लेखकांना ‘वाचन छंद प्रेमी’साहित्य समूहाचे’ सन्मान पत्र देउन नुकतेच गौरविण्यात आले.
दरम्यान,संस्थापक,आयोजक बबनराव वि.आराख यांनी सर्व सहभागी लेखक तथा परिक्षक मनोहर पवार ग्राफिक्सकार जे. नारायण सर याचे ,आभार करून पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.