You are currently viewing करूळ घाट मार्गात निकृष्ट काम खपवून घेणार नाही – नितेश राणें

करूळ घाट मार्गात निकृष्ट काम खपवून घेणार नाही – नितेश राणें

करूळ घाट मार्गात निकृष्ट काम खपवून घेणार नाही

आमदार नितेश राणे यांनी केली करूळ घाट मार्गाची पाहणी

काम दर्जेदार करा : अन्यथा गाठ माझ्याशी

वैभववाडी

करूळ घाटाचे काम निकृष्ट करून तुम्ही जनतेचा पैसा वाया घालवताय. तुमच्या दुर्लक्षामुळे ठेकेदाराने काम निकृष्ट केले आहे. जोपर्यंत हा घाट प्रवासासाठी निर्धोक होत नाही, तोपर्यंत या मार्गे वाहतूक सुरू करू देणार नाही. प्रवाशांचा जीव धोक्यात घालू देणार नाही. घाट मार्गात अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा खडा सवाल आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी श्री कुमावत यांना करत धारेवर धरले. आमदार नितेश राणे यांनी अधिकारी व ठेकेदार यांची घाटात चांगलीच कान उघडणी केली. झालेल्या निकृष्ट कामाचे ठेकेदाराला बिल आदा केल्यास गाठ माझ्याशी आहे असा सज्जड दम श्री. राणे यांनी अधिकाऱ्यांना दिला.
आमदार नितेश राणे यांनी शुक्रवारी सायंकाळी करूळ घाट मार्गाची तसेच करुळ पुलाची पाहणी केली. यावेळी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. या मार्गाचे काम दर्जेदार व्हावे, म्हणून हा घाट मार्ग सुरुवातीला मार्च महिन्यापर्यंत बंदचे आदेश दिले. त्यानंतर ही मुदत वाढली. परंतु या घाटात त्या पद्धतीने त्या गतीने काम झाले नाही. तुम्ही या कामावरती किती वेळा आलात असा सवाल नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना विचारला. असं निकृष्ट दर्जाचे काम करून तुम्ही आम्हाला अडचणीत आणताय. ज्यांना तळकोकणाची माहिती नाही अशा लोकांकडे काम दिले. झालेल्या निकृष्ट कामाबाबत मी माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार व संबंधितांची तक्रार करणार असे नितेश राणे यांनी सांगितले.
ठेकेदाराच्या कामाबाबत आम्ही अजिबात समाधानी नाही. जर या ठेकेदाराला काम झेपत नसेल तर रिटेंडर करून सदर काम दुसऱ्याकडे द्या. यांना काम झेपत नसेल तर कशाला पाठीशी घालताय असा खडा सवाल आमदार नितेश राणे यांनी केला. या ठेकेदाराची बिलं अजिबात काढू नये, काढल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असेही आ. राणे यांनी सांगितले.
करूळ घाटाच्या कामात फक्त ठेकेदाराचे खिसे भरले जात आहेत. वर्षभर काम होणार नाही असे या ठिकाणी वस्तुस्थिती दिसते. दरड कोसळणं थांबणार नाही. यावरही उपाय करा असे आ. राणे सांगितले. या ठेकेदाराने 40 टक्के बिलोने काम घेतले. चुकीची माहिती सांगून ठेकेदाराने काम घेतले. सदर काम थांबवलं असतं तरी आम्हाला शिव्या. करायला दिलं तरी आम्हाला शिव्या. यात नाहक आमची बदनामी होत आहे असे राणे यांनी सांगितले.
ज्या पद्धतीने संबंधित अधिकाऱ्याने डिझाईन दिले असेल तसे ठेकेदाराने काम केलं. कठीण कातळापर्यंत खाली काम झाल असत तर संरक्षण भिंती कोसळल्याच नसत्या. साईटवर न येता केवळ प्लॅन टेबलवर बसून करण्यात आला असल्याने ही परिस्थिती ओढवली आहे असे प्रमोद रावराणे यांनी सांगितले. यावेळी भाजप मंडळ अध्यक्ष नासीर काझी, प्रमोद रावराणे, भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, राजेंद्र राणे, नेहा माईणकर, प्राची तावडे, संजय सावंत, बंड्या मांजरेकर, हुसेन लांजेकर, तहसीलदार सूर्यकांत पाटील, पोलीस निरीक्षक श्री अवसरमोल, अधिकारी श्री जोशी, श्री कुमावत व अधिकारी, कर्मचारी पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

करूळ घाट मार्गात निकृष्ट काम खपवून घेणार नाही – नितेश राणें

काम दर्जेदार करा; अन्यथा गाठ माझ्याशी..

वैभववाडी

करूळ घाटाचे काम निकृष्ट करून तुम्ही जनतेचा पैसा वाया घालवताय. तुमच्या दुर्लक्षामुळे ठेकेदाराने काम निकृष्ट केले आहे. जोपर्यंत हा घाट प्रवासासाठी निर्धोक होत नाही, तोपर्यंत या मार्गे वाहतूक सुरू करू देणार नाही. प्रवाशांचा जीव धोक्यात घालू देणार नाही. घाट मार्गात अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा खडा सवाल आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी श्री कुमावत यांना करत धारेवर धरले. आमदार नितेश राणे यांनी अधिकारी व ठेकेदार यांची घाटात चांगलीच कान उघडणी केली. झालेल्या निकृष्ट कामाचे ठेकेदाराला बिल आदा केल्यास गाठ माझ्याशी आहे असा सज्जड दम श्री. राणे यांनी अधिकाऱ्यांना दिला.
आमदार नितेश राणे यांनी शुक्रवारी सायंकाळी करूळ घाट मार्गाची तसेच करुळ पुलाची पाहणी केली. यावेळी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. या मार्गाचे काम दर्जेदार व्हावे, म्हणून हा घाट मार्ग सुरुवातीला मार्च महिन्यापर्यंत बंदचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले. त्यानंतरही मुदत वाढली. परंतु या घाटात त्या पद्धतीने त्या गतीने काम झाले नाही. तुम्ही या कामावरती किती वेळा आलात असा सवाल नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना विचारला. असं निकृष्ट दर्जाचे काम करून तुम्ही आम्हाला अडचणीत आणताय. ज्यांना तळकोकणाची माहिती नाही अशा लोकांकडे काम दिले. झालेल्या निकृष्ट कामाबाबत मी माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार व संबंधितांची तक्रार करणार असे नितेश राणे यांनी सांगितले.
ठेकेदाराच्या कामाबाबत आम्ही अजिबात समाधानी नाही. जर या ठेकेदाराला काम झेपत नसेल तर रिटेंडर करून सदर काम दुसऱ्याकडे द्या. यांना काम झेपत नसेल तर कशाला पाठीशी घालताय असा खडा सवाल आमदार नितेश राणे यांनी केला. या ठेकेदाराची बिलं अजिबात काढू नये, काढल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असेही आ. राणे यांनी सांगितले.
करूळ घाटाच्या कामात फक्त ठेकेदाराचे खिसे भरले जात आहेत. वर्षभर काम होणार नाही असे या ठिकाणी वस्तुस्थिती दिसते. दरड कोसळणं थांबणार नाही. यावरही उपाय करा असे आ. राणे सांगितले. या ठेकेदाराने 40 टक्के बिलोने काम घेतले. चुकीची माहिती सांगून ठेकेदाराने काम घेतले. सदर काम थांबवलं असतं तरी आम्हाला शिव्या. करायला दिलं तरी आम्हाला शिव्या. यात नाहक आमची बदनामी होत आहे असे राणे यांनी सांगितले.
ज्या पद्धतीने संबंधित अधिकाऱ्याने डिझाईन दिले असेल तसे ठेकेदाराने काम केलं. कठीण कातळापर्यंत खाली काम झाल असत तर संरक्षण भिंती कोसळल्याच नसत्या. साईटवर न येता केवळ प्लॅन टेबलवर बसून करण्यात आला असल्याने ही परिस्थिती ओढवली आहे असे प्रमोद रावराणे यांनी सांगितले.
करूळ नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाच्या साईड च्या भिंतींना तडे गेले आहेत. या पुलाची ही आमदार नितेश राणे यांनी पाहणी केली. सदर संरक्षक भिंती या परत घातल्या जातील असे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी भाजप मंडळ अध्यक्ष नासीर काझी, प्रमोद रावराणे, भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, राजेंद्र राणे, नेहा माईणकर, प्राची तावडे, संजय सावंत, बंड्या मांजरेकर, हुसेन लांजेकर, तहसीलदार सूर्यकांत पाटील, पोलीस निरीक्षक श्री अवसरमोल, अधिकारी श्री जोशी, श्री कुमावत व अधिकारी, कर्मचारी पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा