You are currently viewing “मुख्यमंत्री वयोश्री”योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

“मुख्यमंत्री वयोश्री”योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

मुख्यमंत्री वयोश्री”योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

राज्यातील 65 वर्षे व त्यावरील नागरिकांना त्यांच्य दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांच्या वयोमानपरत्वे येणाऱ्या  अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाय योजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधणे, उपकरणे खरेदी करण्याकरीता तसेच मन स्वास्थ अबाधित ठेवण्यसाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री” योजना  राबविण्यास  शासनाने मान्यता देण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.

             या योजनेतंर्गत लाभार्थी व्यक्ती वयाची 65 वर्षे पूर्ण केली असतील, असे नागरिक पात्र समजण्यात येतील. लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य, केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृध्दापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करु शकतो. लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु. 2 लाखाचा आत असावे. सदर व्यक्तीने मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारव्दारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्त्रोतांकडून तेच उपकरण विनामुल्य प्राप्त केले नसावे. प्रात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात रु. 3000/- थेट लाभ वितरण करण्यात येणार आहे.

             जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी “मुख्यमंत्री वयोश्री” योजना योजनेंसाठी अर्ज सादर करण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेत आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी या कार्यालयाशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा