संत गजानन महाराज रुरल पॉलिटेक्निकचा उन्हाळी परीक्षेचा निकाल ९२ टक्के..
मेकॅनिकल विभागाचा शुभम देसाई ९६.१९% गुण मिळवत प्रथम तर मेकॅनिकल विभागातील वेदांत पोटे- पाटील ९५.४९% गुण मिळवत द्वितीय.
गडहिंग्लज
महागाव येथील संत गजानन महाराज रुरल पॉलिटेक्निकचा उन्हाळी परीक्षेचा निकाल ९२ टक्के लागला. यामध्ये मेकॅनिकल विभागाचा शुभम देसाई याने ९६.१९% गुण मिळवत प्रथम तर मेकॅनिकल विभागातील वेदांत पोटे- पाटील ९५.४९ टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावले . तसेच कॉलेजमधील वीस विद्यार्थी ९० टक्के पेक्षा अधिक गुणानी उत्तीर्ण झाले.
इतर विभागाचा निकाल पुढीलप्रमाणे- कॉम्प्युटर विभागातून श्रेया थोरात ९१.६०, रोहन भादवणकर ९०.८६, तनवी पाटील ९०.८२, सिव्हिल मध्ये प्रज्ञा कदम ९०.४१, शशांक शेलार ८४.६८, संध्या पाटील ८४.३०, इलेक्ट्रिकल मध्ये आदित्य तेऊरवाडे ९४.३८, सानिया बागवान ८९.६०, निखिल पाटील ८९.३७ , मेकॅनिकल मध्ये शुभम देसाई ९६.१९, वेदांत पोटे- पाटील ९५.४९, प्रमोद परीट ९२.६७, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर विभागातून श्रावणी केळोजी ९०.७८, राज जाधव ८८.३३, अपूर्व मुसंडी ८७.३३, मेकेट्रोनिक्स मध्ये श्रेयस मोटे ८९.२३, लक्ष्मी बंदी ८७.८८, राजवर्धन शिप्पूरकर ८६.५६, मेडिकल लॅब टेक्निशियन मध्ये संजना सावंत ९०.४८, कुणाल नाईक ९०.३९, वृषाली पाटील ८७.६८ टक्के गुण मिळवत अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्या रोहिणी पाटील व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले तर संस्थाध्यक्ष ॲड.अण्णासाहेब चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, डॉ. यशवंत चव्हाण ॲड.बाळासाहेब चव्हाण यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.