अनधिकृत होल्डिंग लावणारे उबठाच्या नाईट लाईफ गॅंग चे पार्टनर
*आमदार नितेश राणे यांची घणाघाती टीका
(विधान भवन)
अनधिकृत होल्डिंग लावणारे मातोश्री ला किती हप्ता देतात. त्या हिशोबाची यादी देण्याची वेळ आमच्यावर आणू नका. होल्डिंग वाल्यांचे अर्धे मालक हे यांचे नाईट लाईफ चे पार्टनर आहेत. संध्याकाळी सात वाजल्यानंतर हेच लोक आणि त्यांची नाईट लाईफची गॅंग रिजवी कॉलेजच्या मागच्या बंगल्यात बसते. आता हप्ते कमी झाल्यामुळे होर्डिंग वाल्यांच्या मागे हे लागलेले आहेत.हा निवडणुकीला चंदा जमा करण्याचा प्रकार आहे. अशी टीका भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी उबाठा सेनेवर केली.
विधिमंडळा बाहेर पत्रकार,माध्यम प्रतिनिधी यांच्याशी बोलताना आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत, उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला. संजय राऊत ने भांडुप चे घर सोडून आणि त्याचा मालक उद्धव ठाकरे यांनी मातोश्री सोडून राज्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर गेले असते तर महायुतीचे सरकार शेतकऱ्यांना किती मदत करते.याचा अनुभव आला असता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनिपुर मध्ये परिवर्तन आणलेले आहे. हे त्यांचे काम पाहण्यासाठी संजय राऊत यांना भांडुप सोडून मणिपूरला जावे लागेल.म्हणजे त्या ठिकाणची शांतता त्यांना प्रत्यक्षात अनुभवता येईल.असा टोला लगावला.