You are currently viewing दर्जेदार गझललेखन शिवधनुष्य पेलण्यासारखे!” – प्रा. डॉ. अविनाश सांगोलेकर

दर्जेदार गझललेखन शिवधनुष्य पेलण्यासारखे!” – प्रा. डॉ. अविनाश सांगोलेकर

*”दर्जेदार गझललेखन शिवधनुष्य पेलण्यासारखे!” – प्रा. डॉ. अविनाश सांगोलेकर*

*’चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी…’ शब्दधन काव्यमंचचा उपक्रम*

पिंपरी

“दर्जेदार गझललेखन शिवधनुष्य पेलण्यासारखे असते! मीना शिंदे या मराठीत दिवान लिहिणार्‍या आद्य महिला गझलकार आहेत. आपल्या लेखनातून त्यांनी प्रयोगशीलता जपली आहे!” असे गौरवोद्गार आद्य मराठी गझल संशोधक प्रा. डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी वाकड, पिंपरी येथे काढले. शब्दधन काव्यमंच आयोजित ‘चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी…’ या उपक्रमात ज्येष्ठ गझलकारा मीना शिंदे यांना सन्मानित करताना सांगोलेकर बोलत होते. सन्मानचिन्ह, ग्रंथ, शाल आणि श्रीफळ असे सत्काराचे स्वरूप होते.

सत्काराला उत्तर देताना मीना शिंदे यांनी, “ज्ञानोबा – तुकोबा यांच्या पालखी प्रस्थानाच्या वेळी ‘साहित्यिक येता घरा, तोचि दिवाळी – दसरा” अशी भावना माझ्या मनात आहे. सुमारे चोवीस वर्षांपासून शब्दधन या संस्थेशी माझे ऋणानुबंध आहेत. वडिलांकडून वाचनाचा तर श्वसुरांकडून सामाजिकतेचा वारसा मला लाभला. एक सारथी म्हणून आजपर्यंत पतीची साथ मिळाली आहे!” असे मनोगत व्यक्त करून,
“मावळत्या सूर्याला प्रश्न रोजचे छळती
तेजोमय तार्‍याचे नेत्र असे पाझरती!”
ही गझल सादर केली. आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर आय. के. शेख यांनी, “आली पालखी आली दारी…” ही भक्तिरचना सादर करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुभाष चव्हाण यांनी प्रास्ताविकातून शब्दधन काव्यमंचाची चोवीस वर्षांची वाटचाल कथन केली. रघुनाथ पाटील यांनी,
“कातरवेळी कातर कातर स्वर माझा
ये ना सजना कायापालट कर माझा!”
या मीना शिंदे लिखित गझलेचे ओघवते रसग्रहण केले. मधुश्री ओव्हाळ यांनी वंदना विटणकर लिखित “शोधिशी मानवा…” या गीताचे गायन केले करून कार्यक्रमात रंगत आणली. रेखा कुलकर्णी यांनी मीना शिंदे यांची गझल सादर करून मैत्रीच्या आठवणी जागविल्या तर शोभा जोशी यांनी आशीर्वादपर शुभेच्छा दिल्या.

शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक, ह. भ. प. अशोकमहाराज गोरे, जयश्री गुमास्ते, संजय शिंदे यांनी संयोजन केले. तानाजी एकोंडे यांनी बहारदार सूत्रसंचालन केले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

______________________________
*संवाद मिडिया* जाहिरात

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
https://sanwadmedia.com/139227/

*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच *24 जून पासून सुरू*

========================
*MHT -CET बॅच*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
ऑफिस 9422896719

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा