निगडी, प्राधिकरण-(प्रतिनिधी)
भारतरत्न डॉ.बिधन चंद्र रॉय यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी होणारा १ जुलै ‘भारत राष्ट्रीय डॉक्टर दिन ‘ प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ व मधूमेह रुग्ण संघ यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास अध्यक्ष व मुख्य आतिथी डॉ.श्री पृथ्वीराज पोपटराव उगले म्हणून लाभले.त्यांचा सत्कार मधुमेह संघटनेचे अध्यक्ष डॉ.श्री दिगंबर इंगोले यांनी केला. तसेच प्राधि.ज्येष्ठ ना. संघाचे अध्यक्ष श्री भगवान महाजन व मधुमेह संघटनेचे अध्यक्ष डॉ.श्री इंगोले यांचा सत्कार प्रमुख अतिथी श्री डॉ.उगले यांनी केला.
सभेस संबोधित करताना वात,पित्त,कफाचे दोष म्हणजे स्वास्थ बिघडणे, आणि समतोल साधणे म्हणजे स्वस्थ आरोग्य असते. शारिरिक,आर्थिक,सामाजिक ,मानसिक ,अध्यात्मिक ह्या पंचसुत्रीचा समतोल राखला तर जीवनाचा प्रवास सुखकारक होतो.
महाभारत,गीता, ज्ञानेश्वरी हे ग्रंथ सेवानिवृत्तीनंतर नव्हे तर तरुणपणी अभ्यासावे तरच मार्गदर्शक ठरतील असे कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे व वक्ते आयुर्वेदाचार्य डॉ. पृथ्वीराज उगले यांनी सांगितले. आरोग्याच्या संबंधित विविध मुद्यांवर ते बोलत होते. यावेळी संघातील उपस्थित सदस्य डॉक्टर्स दिंगंबर इंगवले, शिवराम म्हत्रे, शुभांगी म्हत्रे, गुणवंत चिखलीकर, प्रमिला उन्नरकर,रजनी जैन व बर्हाटे यांचे सत्कार करण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुभाष जोशी, उपाध्यक्ष यांनी केले. संस्था अध्यक्ष डॉ.दिगंबर इंगोले यांनी मधुमेह रुग्ण संघटने बाबत माहिती दिली. भगवान महाजन यांनी ज्ये.नागरिक संघा बाबत आपले मनोगत वेक्त केले. श्री शामसुंदर परदेशी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. या प्रसंगी कार्यकारिणीचे पदाधिकारी व माजी अध्यक्ष उपस्थित होते. कार्याध्यक्षा चांदबी सैय्यद यांनी आभार प्रदर्शन केले.
बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर
9890567468