You are currently viewing पालकमंत्रीच किंगमेकर!

पालकमंत्रीच किंगमेकर!

*पालकमंत्रीच किंगमेकर!*

*निरंजन डावखरे यांच्या विजयाने कोकणात भाजपची मुळे आणखी घट्ट झाली! भाजपा कार्यकर्त्यांना जल्लोषाचा हक्कच! – भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांचा पत्रकार परिषदेत दावा*

कोकण पदवीधर मतदारसंघातील कोकणचा विजय हा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या रणनीतीचा शंभर टक्के विजय आहे. कोकण हा अन्य कुठल्याही पक्षाचा नव्हे तर भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे हे समीकरण मागील काही कालावधीत कोकणचे नेते खासदार नारायणराव राणे आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून घडवलेले आहे. कोकण पदवीधर निवडणूकीतील भाजपाच्या अद्वितीय यशाने मा. रविंद्रजी चव्हाण यांची किंगमेकर ही प्रतिमा पुन्हा एकदा उजळून निघाली आहे. त्यांच्या अचूक नियोजनाच्या ताकदीवर भविष्यातही प्रत्येक निवडणूकीत कोकण ही भाजपाचीच राजधानी असेल, आणि हा प्रभाव लवकरच राज्यात इतरत्रही दिसून येईल असा विश्वास भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशालभाई परब यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. सावंतवाडी येथील भाजयुमो कार्यालयात आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी कोकण पदवीधर मतदार संघ निवडणूकीत केलेल्या मार्गदर्शनाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांचेही कौतुक आहे आणि म्हणूनच आज निरंजन डावखरे यांच्या विजयाची मिठाई वाटून हे यश आणि सर्वजणानी साजरे केले आहे. हा जल्लोष हा भाजपा कार्यकर्त्यांचा हक्कच असल्याचे विशालभाई परब यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा