You are currently viewing परुळेबाजार ग्रामपंचायत वसंतराव नाईक शेतीकेंद्रीत ग्राम पुरस्काराने सन्मानित

परुळेबाजार ग्रामपंचायत वसंतराव नाईक शेतीकेंद्रीत ग्राम पुरस्काराने सन्मानित

मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

 

परुळे :

परुळेबाजार ग्रामपंचायतीला वसंतराव नाईक शेती केंद्रीत ग्राम पुरस्कार प्राप्त झाला. १ जुलै २०२४ रोजी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.

वसंतराव नाईक कृषीसंशोधन व विकास प्रतिष्ठान मुंबई यांच्या मार्फत दिला जाणारा हा ग्राम स्तरावरील उल्लेखनीय उपक्रमांबद्दलचा पुरस्कार परुळे बाजार ग्रामपंचायतीला जाहीर झाला होता. १ जुलै रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या १११ वा जन्मदिन व कृषीदिना निमिताने मुंबई येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री श्री धनंजय मुंडे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कुलगुरु प्रशांतकुमार गुलाबाराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी १ जुलै २०२४ कृषी दिनानिमित्त वसंतराव नाईक प्रतिष्ठानतर्फे शेती बागायती प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान. एकनाथ शिंदे व कृषीमंत्री मा. धनंजय मुंढे यांच्या हस्ते परुळे बाजार ग्रामपंचायतला पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी परुळे बाजार सरपंच प्रणिती आंबडपालकर, ग्रामसेवक शरद शिंदे, उपसरपंच राजू दुधवडकर, माजी सभापती निलेश सामंत, माजी तंटामुक्ती अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रसाद पाटकर उपस्थित होते. प्रतिष्ठानमार्फत विविध स्तरावर कृषी व ग्राम पातळीवर उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्था व्यक्ति यांना सन्मानित करण्यात येते. यावर्षीचा ग्राम स्तरांवरील बहुमान ग्रामपंचायत परुळेबाजार ला प्रधान करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा