प्रत्येक गावासाठी कॅम्प घेवून उत्पन्नाचे दाखले वितरित करावे – मंगेश तळवणेकर:
तहसीलदारांकडे केली निवेदनद्वारे मागणी…
सावंतवाडी
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला आवश्यक असून त्यासाठी तलाठी महोदयांची गरज लागते. सावंतवाडी तालुका विस्ताराने मोठा असल्याने व तहसिल कार्यालय ते गावे ही लांब असल्याने प्रत्येक गावासाठी कॅम्प घेवून उत्पन्नाचे दाखले वितरीत करावेत अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे केली.
श्री तळवणेकर यानी तहसीलदार श्री पाटील यांचे लक्ष वेधताना म्हटले की लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्यांचे जन्मनोंद दाखले किंवा विवाह नोंद दाखले नसतील त्यांना मुलांच्या जन्मनोंद किंवा शाळेच्या दाखला दिल्यावर अथवा स्वयंघोषणापत्र ग्राह्य धरावे तसेच 16 जुलै पुर्वी उत्पन्नाचे सर्व दाखले वितरीत करावे अशी मागणी केली. श्री तळवणेकर यांची मागणी लक्षात घेता तहसीलदार यांनी याला हिरवा कंदील देत लवकरात लवकर दाखल घेण्याचे मान्य केले