You are currently viewing विज्ञान/गणित विषयाचे विषय शिक्षक पदोन्नती प्रक्रिया राबविण्याचे शिक्षण संचालकांचे आदेश

विज्ञान/गणित विषयाचे विषय शिक्षक पदोन्नती प्रक्रिया राबविण्याचे शिक्षण संचालकांचे आदेश

*विज्ञान/गणित विषयाचे विषय शिक्षक पदोन्नती प्रक्रिया राबविण्याचे शिक्षण संचालकांचे आदेश*

*शिक्षक परिषदेच्या मागणीला यश*

*सिंधुदुर्ग*

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या पत्रांची दखल घेत जिल्हा परिषद अंतर्गत पदभरतीपूर्वी कार्यरत शिक्षकांतून विज्ञान/गणित विषयाचे विषय शिक्षक पदोत्रती प्रक्रिया राबविण्याबाबत आज शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्राद्वारे आदेश दिले.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील कार्यरत शिक्षकांमधून बीएससी पदवीधर पदोन्नतीची पदस्थापना न दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्गमार्फत १९ सप्टेंबर २०२३ पहिले व १० जून २०२४ रोजी दुसरे लाक्षणिक धरणे आंदोलन केले होते. जिल्ह्यातील विज्ञान व गणित विषय पदवीधरांची ३२४ पदे रिक्त आहेत तसेच अंतिम सेवाजेष्ठता यादी तयार असूनही अद्याप पदस्थापना देण्यात आलेली नव्हती. याबाबत शिक्षक परिषदेचे राज्यध्यक्ष राजेश सुर्वे यांनी ११ जून २०२४ रोजी शिक्षक संचालकांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदर विषयाबाबत निवेदन देऊन चर्चा केली. तसेच शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे संस्थापक अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनीही ११ जून २०२४ रोजी संचालकांशी पत्रव्यवहार केला. या सर्व पत्रांच्या मागणीचा विचार करून जिल्हा परिषदांमध्ये विज्ञान / गणित विषयाचे शिक्षक पदे रिक्त आहेत. अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी आधारे जिल्हा परिषदांतर्गत पदभरतीपुर्वी सद्या जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत शिक्षकांपैकी गणित व विज्ञान या विषयासाठी रिक्त पदांच्या मर्यादेत सेवाजेष्ठ शिक्षकांमधून गुणवत्तेनुसार इयत्ता ६ वी व इयत्ता ८ वी करीता विज्ञान/गणित या विषय शिक्षकांसाठी रिक्त पदांच्या मर्यादेत पदोन्नतीची प्रक्रिया आपल्या स्तरावरून शासन नियमानुसार राबविण्यात यावी असे आदेश शरद गोसावी शिक्षण संचालक (प्राथमिक) प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्राद्वारे आदेशीत केले आहे.
याचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबर सर्व जिल्ह्यातील बीएससी पदवीप्राप्त कार्यरत शिक्षकांना होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष गणेश नाईक यांनी सांगितले.

_____________________________
*संवाद मीडिया* जाहिरात

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*‌प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….प्रवेश सुरू…….*

*शिक्षणासोबत नोकरीची हमी* *फक्त*!!!!

*👉दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,*👩‍⚕👩‍⚕

*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता….(ऍडमिशन) प्रवेश* *सुरु आहे*.
https://sanwadmedia.com/137740/

*दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,* रत्नागिरी येथे १२ वी उत्तीर्ण रत्नागिरीतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याकरिता सुवर्ण संधी.
खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु.
*▪️B.Sc Nursing*
*▪️Post Basic B.Sc Nursing*
*▪️M.Sc Nursing*
*▪️GNM*
*▪️ANM*

_अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित हॉस्पिटल मध्ये १००% नोकरीची हमी, तसेच परदेशात सुद्धा काम करण्याची सुवर्ण संधी._

_राज्य सरकारच्या नियमानुसार शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध तसेच मर्यादित विद्यार्थ्यांना खाजगी संस्था कडून शिष्यवृत्ती चा लाभ._

_प्रवेश निश्चित करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा._
*📲८६००३०२४५४*
*📲९४२३२९१८६३*
*📲८८३०७८९५७०*

*प्रवेशासाठी अधिक माहितीकरिता खालील लिंक क्लिक करून आपली माहिती सादर करा.*

https://forms.gle/4i3u6hNgVriV7Msr7

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा