You are currently viewing तुझा ध्यास लागो देवा

तुझा ध्यास लागो देवा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*तुझा ध्यास लागो देवा*

 

तुझा ध्यास लागो देवा दुजे नको काही

पाठीशी तू रहा माझ्या, पंढरीची आई …॥धृ॥

 

माय पंढरीची माझी दयाळू कृपाळू

पावन ती आहे भीमा पंढरीची वाळू

टाळ मृदुंग नि वीणा लीन तुझ्या पायी

ध्यास तुझा लागो देवा ….॥१॥

 

संतसज्जनांचा वास अंगणात देवा

नामदेवाची पायरी वाटतसे हेवा

कान्होपात्रा उद्धरिली जनी ची पुण्याई

ध्यास तुझा लागो देवा…॥२॥

 

चोखामेळा नि सावता नरहरी सोनार

नाम घेता घेता तुझे करती व्यापार

संजिवनसमाधी ती ज्ञानदेवा ठायी

ध्यास तुझा लागो देवा…॥३॥

 

आम्ही पामर हो देवा भक्ती नाही ठावे

एक मंत्र जाणतो रे नाम तुझे घ्यावे

पाप पुण्याचा हिशोब कर ग विठाई

ध्यास लागो तुझा देवा…

 

 

प्रा.सौ.सुमती पवार UK

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा