You are currently viewing कृषी मेळाव्यानिमित्त फवारणी, यंत्राच्या साहाय्याने लावणी प्रात्यक्षिक…

कृषी मेळाव्यानिमित्त फवारणी, यंत्राच्या साहाय्याने लावणी प्रात्यक्षिक…

कृषी मेळाव्यानिमित्त फवारणी, यंत्राच्या साहाय्याने लावणी प्रात्यक्षिक…

वैभववाडी
पंचायत समिती वैभववाडी व महाराष्ट्र राज्य कृषी विभाग वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कोकिसरे महालक्ष्मी मंदिर येथे कृषी मेळावा ड्रोन कॅमेरा च्या माध्यमातून फवारणी प्रात्यक्षिक व लावणी यंत्राच्या साह्याने भात लावणी प्रात्यक्षिक दाखवण्यात आले त्यावेळी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो यावरही मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी गटविकास अधिकारी आर डी जंगले,तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील, पंचायत समिती कृषी अधिकारी भरसट,फोडा कृषी संशोधन केंद्राचे डॉ विजय शेटे, कृषी महाविद्यालय सांगुळवाडीचे प्रा फुटणकर,कोकिसरे सरपंच प्रकाश सुतार,आर्दश शेतकरी महेश संसारे,शेतकरी विलास देसाई, वैभववाडी तालुका भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा प्राची तावडे कृषी विस्तार अधिकारी प्रकाश अडुळकर, आदी मान्यवर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा