You are currently viewing सेवाभावी वृत्तीच्या विशाखा खवणेकर यांचे निधन

सेवाभावी वृत्तीच्या विशाखा खवणेकर यांचे निधन

मुंबई –

 

देवगड तालुक्यातील तांबळडेग गावाच्या सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रमात नेहमी सक्रीय सहभाग असणाऱ्या सेवाभावी वृत्तीच्या सौ. विशाखा विठोबा खवणेकर यांनी दि. २९ जुलै रोजी भांडुपच्या खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पूर्वीश्रमीच्या श्रीमती मंगल रघुनाथ कुबल यांनी धार्मिक कार्यक्रमांतून आपली सामाजिक बांधिलकी जपत परोपकारी वृत्तीने त्या अखेर पर्यंत कार्यरत होत्या. त्यांच्या जाण्याने खवणेकर, कुबल शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पती विठोबा खवणेकर सेवानिवृत्त नेव्हल डॉक तसेच कन्या सोनाली, श्रुती असा परिवार आहे. सौ. विशाखा खवणेकर यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यावर भांडुप येथील हिंदू स्मशानभूमी अंत्य संस्कार करण्यात आले. त्यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा