You are currently viewing विठ्ठला

विठ्ठला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गझलकार जयराम धोंगडे लिखित अप्रतिम गझल*

 

*विठ्ठला*

 

सावळ्या विठ्ठला तू लळा लावतो…

अंतरीचा फुलाया मळा लागतो!

 

मी विनामागता केवढे तू दिले…

आवळा अर्पिता कोहळा लाभतो!

 

वाट तू पाहतो केवढा विठ्ठला…

नेहमी यायचा नेम मी पाळतो!

 

पंढरी शोभली चंद्रभागे तिरी…

नित्य स्वर्गातला सोहळा भासतो!

 

कर कटी ठेवुनी तू युगाचा उभा…

ध्यान ते पाहता जीव वेडावतो!

 

जयराम धोंगडे

प्रतिक्रिया व्यक्त करा