– एकनाथ आंबोकर
सिंधुदुर्गनगरी
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 19 जानेवारी 2020 रोजी झालेली आहे. सदर परीक्षेमध्ये पात्र ठरलेल्या परीक्षार्थींचे प्रमाणपत्रे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागास प्राप्त झालेली आहेत. तरी संबंधितांनी सदरची प्रमाणपत्रे सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 9.45 ते सायं. 6.15 या वेळेत पात्र परीक्षार्थींना देण्यात येणार आहेत.तरी संबंधितांनी आपली प्रमाणपत्रे घेवून जावीत, असे आवाहन जि.प. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) एकनाथ आंबोकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता प्रवेशपत्र प्रत, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा गुणपत्रिका, डी.टी.एड. उत्तीर्ण गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र अथवा बी.एड उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिका, आरक्षण प्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र, अपंगत्वाचे प्रमाणपत्र (आवश्यकतेनुसार), ओळखपत्र जसे आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक ओळखपत्र इत्यादी आणणे आवश्यक आहे अशी माहिती जि.प. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) एकनाथ आंबोकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.