You are currently viewing स्मृति भाग ७४

स्मृति भाग ७४

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग ७४*  

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

सर्वप्रथम २०२१च्या १५आॅगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा . हा स्वातंत्र्यदिवस जेंव्हा तिथीने साजरा होईल , त्यावेळेस भारत खरा मार्गस्थ झाला , आत्मनिर्भर झाला असे मी समजेन !!🙏🙏आणि ज्या देशात वशिष्ठसंस्थाच नाही ! त्या देशात राम मंदिराचे महत्व मंदिर आणि पर्यटन स्थळापुरतेच राहिल का मनामनात राम बसेल ! ही पण शंकाच आहे . कारण रामरक्षण आणि इतर रक्षणे ( जसे पदरक्षण , वित्तरक्षण , आरक्षण , संस्थारक्षण इ. ) यात फरकच आहे !! असो . तो विषय इथला नाही . आपण स्मृतिच पाहू .

१) आपद्ग्रस्त असतांना ब्राह्मण अब्राह्मणाकडून विद्यार्जन करु शकतो . — ही पहिलीच ओळ गौतम स्मृतितील आपद्धर्म वर्णनात आहे . पण या ओळीचा अर्थच हा होतो की त्या काळी ही अब्राह्मणसुद्धा विद्योपार्जन करत होते . तशी समाजरचना होती . त्याशिवाय आपद्ग्रस्त ब्राह्मण अब्राह्मणाकडून कसे विद्योपार्जन करेल !!

२)ब्राह्मण अब्राह्मणाकडून विद्योपार्जन करत असतांना त्याने त्यावेळेस शिकवणाराचे अनुगमन करावे व त्याची सेवा करावी . — काय सुचवते हे वाक्य ? अब्राह्मण हा क्षत्रिय—वैश्य वा शूद्र कुणीही असू शकतो !! पण विद्यार्जनाचे वेळेस तो कुणीही असो , त्याची सेवाच करण्याची सूचना जर स्मृति देत असतील तर त्या वाईट कशा ?

३)जर ब्राह्मणास ब्राह्मणी वृत्ति प्राप्त झाली नाही तर त्याने क्षत्रिय वा वैश्याच्या वृत्तीचा स्वीकार करावा . — ही वाक्यरचना काय शिकवते ? तर आमच्या ऋषिंनी जी चातुर्वर्ण्य व्यवस्था तयार केली ती वृत्ति आधारित होती , जन्माधारित नाही . आपण विद्योपार्जन केल्यावर कोणते कर्म वा कृती स्वीकारतो ? यावर वृत्ती ठरुन तो त्या वर्णाचा गणला जावयास हवा , हेच प्रतीत होते . पण विचित्र बोंबा मारणारांची भारतात कमी नसल्यामुळे आम्ही मागे पडत आहोत .

४)वैश्य वृत्ति स्वीकारल्यावर ब्राह्मणाने काय विकावे व काय नाही ? याचा उल्लेख ही आहे . — शेवटी बंधनाशिवाय कुणीही उंच होत नाही , मोठे होत नाही , हेच खरे .

५) सामर्थ्या अभावी सर्व वर्ण सर्व वृत्तिंचा स्वीकार करुन आजीविका चालवू शकतात . परंतु शूद्रवृत्ति स्वीकारु नये . पण प्राण संशय उत्पन्न झाल्यास शूद्रवृत्तिही स्वीकारण्यास हरकत नाही . तेंव्हा अभक्षभक्षण टाळावे . — एवढे सूक्ष्म स्मृतींनी सांगितले तर स्मृतिंना अमान्य ठरवणारे किती आंधळे असावेत !!

प्राण रक्षणासाठी ऋषिंनी ही अभक्ष्य भक्षण केल्याचा उल्लेख आहे . पण त्यात ते रममाण होवून कायमस्वरुपी अधःपतीत झाल्याचे उल्लेख नजरेत नाहीत . कारण आमच्या संस्कृतीत वाल्मिकी व व्यास आहेत . हे सत्य असूनही काही अविवेकी अवास्तव बडबड करतांना पाहिले वा ऐकले की लाज वाटते त्यांची .

तशा सर्वच स्मृति वाचनीयच आहेत , चिंतनीय आहेत , मननीय आहेत आणि प्रवचनीय ही आहेत . वाचाल ना स्मृति ? 🙏🙏

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०

प्रतिक्रिया व्यक्त करा