*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*चहा चहा चहा….*
वर्णू चहाला मी किती त्याचा नकोच दुरावा
खूप खूप उकळावा गंध त्याचा दरवळावा
चव चाखली नसेल त्यांनी पिऊन पहावा…..
आहे अमृततुल्य तो घरोघरी प्रस्थ त्याचे
किती काळ तो लोटला तरी ओठावर नाचे..
कोणी प्यावा त्यास किती नाही धरबंघ
घरोघरी स्वागतास तयार हो भाऊबंध..
गोडी अविट हो त्याची सुटे तोंडाला पाझर
नाव काढताच त्याचे जाती पळून आजार..
काही इतके वेडे की येताजाता पिती चहा
नाव काढता चहाचे कळी खुलतेच”अहा”
मूळ शोधू नये त्याचे येता जाता तो ढोसावा
लोक म्हणतात असे कुठे कितीही तो प्यावा…
आज प्रकार ते किती रस्तोरस्ती फुटे पेव
झुंडी जमती भोवती होते त्याची देवघेव
नाही पाजला कुणाला म्हणे कंजुष तो किती
चहा प्यावा चहा द्यावा त्याला नको मोजमिती…
जगभर चहा भक्त नाही तुटवडा त्यांचा
चहा एकमेव पेय जन्म जाई हो सुखाचा
चहा उकळावा रोज रोज पातेले भरून
वास येताच चहाचा भक्त येतील दुरून..
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)