You are currently viewing मैत्री

मैत्री

*लालित्य नक्षत्रवेल तथा साहित्य प्रेरणा कट्टा आजगावच्या सन्मा.सदस्या लेखिका कवयित्री सौ.स्नेहा नारिंगणेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मैत्री*

(अष्टाक्षरी रचना)

 

बंध जुळता मैत्रीचे

आनंदाचा वाहे झरा

दोन मने जोडताना

अतुट साकव खरा…1

 

मैत्री म्हणजे मजला

घेतलेला तुझा श्वास

प्रतिबिंब पाहताना

रूप माझे तुझा भास..2

 

तुझ्या माझ्या भावनात

काय गुपित लपलं

स्नेहबंध शोधताना

तुजं अंतरी जपलं…3

 

आयुष्यात उधाणली

जेव्हा दुःखाची ललाट

वादळात सापडली

दीपस्तंभा तुझी वाट….4

 

सावलीस भीत असे

अजी अंधारली रात

काळोखात प्रकाशल्या

काजव्यात तुझी साथ…5

 

 

सौ .स्नेहा धोंडू नारिंगणेकर

शिरोडा सिंधुदुर्ग

प्रतिक्रिया व्यक्त करा