You are currently viewing पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांची ४ जुलैला ८७ वी पुण्यतिथी…

पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांची ४ जुलैला ८७ वी पुण्यतिथी…

पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांची ४ जुलैला ८७ वी पुण्यतिथी…

सावंतवाडी

श्रीमंत मेजर खेमसावंत तथा पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांची ८७ वी पुण्यतिथी ४ जुलैला सकाळी १० वाजता येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयात साजरी करण्यात येणार आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावंतवाडी संस्थानचे राजे खेमसावंत भोसले तर प्रमुख अतिथी म्हणून कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डाॅ. सौ. राजश्री संदीप साळुंखे उपस्थित राहणार आहेत. दरम्यान या प्रसंगी “खेमराजीय” या वार्षिक अंकाचे प्रकाशन होणार आहे. यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन पंचम खेमराज महाविद्यालयाच्या चेअरमन सौ. शुभदादेवी भोसले, युवराज लखम सावंत भोसले व युवराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोसले यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा