You are currently viewing मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण प्रवेशासाठी 30 जून पर्यंत अर्ज सादर करा

मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण प्रवेशासाठी 30 जून पर्यंत अर्ज सादर करा

मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण प्रवेशासाठी 30 जून पर्यंत अर्ज सादर करा

सिंधुदुर्गनगरी 

 मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या सहा महिने मुदतीचे सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयनशाख व डिझेल इंजिन देखभाल व परिचालण प्रशिक्षणाचे 84 वे सत्र दिनांक 1 जुलै 2024 पासून मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, सिंधुदुर्ग -मालवण येथे सुरू होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील मच्छिमार युवकाडून दिनांक 30 जून 2024 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी यांनी केले आहे.

त्याचा तपशील पुढीलप्रमाणे :-

1) प्रशिक्षण कालावधी:- दिनांक 1 जुलै 2024 ते 31 डिसेंबर 2024

2) आवश्यक पात्रता : उमेदवारांचे वय 18 ते 35 असावे, (आधार कार्ड व रेशन कार्ड ची छायाप्रत जोडणे). उमेदवार किमान चौथी पास असणे आवश्यक, (शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायाप्रत जोडणे आवश्यक)  क्रियाशील मच्छिमार असावा, (विहित नमुन्यातील अर्जावर मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस घ्यावी) उमेदवारास पोहता येणे आवश्यक.

3) प्रशिक्षण शुल्क : सहा महिन्याचे रु 2700/- मात्र, दारिद्रय रेषेखालील असल्यास सहा महिन्याचे रु. 600/- मात्र, (दारिद्रय रेषेखालील दाखला आवश्यक)

4) रोजगार/स्वयंरोजगाराच्या संधी:  राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) अंतर्गत योजनेतून अर्थसाहाय घेऊन नौका बांधता येते. सागरी नौकेवर पात्रतेनुसार खलाशी म्हणून रोजगाराची संधी उपलब्ध होवू शकते.

तरी इच्छुक युवकांनी या प्रशिक्षण केंद्राशी किंवा सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाययांचे कार्यालयास संपर्क साधल्यास विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल. अर्ज स्वतःच्या हस्ताक्षरात भरून त्यावर संस्थेची शिफारस घेवून विहित नमुन्यातील अर्ज दिनांक 30जून 2024 पर्यंत कार्यालयाच्या वेळेत कामकाजाच्या दिवशी वर नमूद केलेल्या कार्यालयास सादर करावे.

 अधिक माहितीसाठी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी र. ग. मालवणकर मोबईल नंबर 9422216220, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांचे कार्यालय सेवांगण रोड, धुरीवाडा, मालवण येथे संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा