You are currently viewing आदिवासी विकास विभागाने दिलेली जाहिरात तुर्तास स्थगित

आदिवासी विकास विभागाने दिलेली जाहिरात तुर्तास स्थगित

आदिवासी विकास विभागाने दिलेली जाहिरात तुर्तास स्थगित

 सिंधुदुर्गनगरी 

आदिवासी विकास विभागाची दिनांक 23 नोंव्हेबर 2023 रोजी  दिलेली जाहिरात तुर्तास स्थगित करण्यात येत असून यांची नोंद सर्व अर्ज भरलेल्या उमेदवारांनी घ्यावी. याबाबत आदिवासी विकास विभागातील क्षेत्रीय कार्यालयाकडून पुनश्च बिंदूनामावली अद्यावत करण्याची कार्यवाही सुरु आहे. सदर बिंदूनामावली अद्ययावत झाल्यानंतर ह्या बाबतची पुढील कार्यवाही सविस्तर कळविण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, अशी माहिती नाशिक आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे यांनी दिली आहे.

 आदिवासी विकास विभागामार्फत जाहिर प्रगटन करण्यात येते की, आयुक्त, आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या स्तरावरुन दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी आदिवासी विकास विभागामधील 602 विविध रिक्त पदांकरीता जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार दिनांक 23 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आलेले होते. विविध पदांकरीता उमेदवारांची ऑनलाईन पध्दतीने अर्ज प्राप्त झालेले आहेत.

            सन 2024 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 16, दिनांक 26 फेब्रुवारी 2024 अन्वये सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) (Socially and Educationally Backward Classes) (SEBC) या संवर्गाचा समावेश करुन जाहिरात पुनश्च प्रसिध्द करणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार पुनश्च बिंदूनामावली अद्यावत करुन गट-क संवर्गासाठी पुनश्च जाहिरात प्रसिध्द करण्याबाबत शासन स्तरावरुन सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा