You are currently viewing क्रीडा प्रबोधनीकरिता होणाऱ्या प्रवेश चाचणीसाठी 4 जुलै पर्यंत अर्ज सादर करा

क्रीडा प्रबोधनीकरिता होणाऱ्या प्रवेश चाचणीसाठी 4 जुलै पर्यंत अर्ज सादर करा

क्रीडा प्रबोधनीकरिता होणाऱ्या प्रवेश चाचणीसाठी 4 जुलै पर्यंत अर्ज सादर करा

सिंधुदुर्गनगरी 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व्दारा शिवछत्रपती क्रीडापीठ अंतर्गत महाराष्ट्रातील 9 क्रीडा प्रबोधिनीकरिता खेळानिहाय रिक्त पदाची संख्या तसेच खेळाडूंची क्षमता कौशल्य विचारात घेऊन खेळाडूची निवड करण्यात येणार आहे. खेळाडूंची प्रवेश चाचणी जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तरावर 19 वर्षाआतील खेळाडूंकरिता होणार आहे. या चाचणीकरिता दिनांक 4 जुलै 2024 पर्यंत जिल्ह्यातील संबधित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात आवश्यक त्या कागदपत्रासह खेळाडूंनी नाव नोंदणी करावयाची आहे.

 या प्रवेश चाचणीकरिता येणाऱ्या खेळाडूंनी आधारकार्ड, खेळाचे प्रमाणपत्र, वयाचा दाखला, या सह क्रीडा कार्यालयातून देण्यात येणाऱ्या अर्जासोबत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात दिनांक 4 जुलै 2024 पूर्वी दाखल करावयाचे आहे. सदर प्रवेश चाचणी हो आर्चरी, हॅण्डबॉल, बॉक्सिग, बॅडमिटन, कुस्ती, अॅथलेटिक्स, जलतरण, शुटींग, सायकलिंग, हॉकी, फुटबॉल, ज्युदो, टेबल टेनिस, वेटलिफ्टींग, जिम्नॅस्टिक इत्यादी क्रीडा प्रकाराकरिता होणार आहे.

नाव नोंदणी झाल्यानंतर खेळाडूंना विभागीय चाचणीची दिनांक 8 व 9 जुलै 2024 व राज्यस्तरीय प्रवेश चाचणी दि.15 व 16 जुलै 2024 या कालावधीमध्ये होणार आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय खेळाडूंनी क्रीडा प्रबोधनीकरिता होणाऱ्या प्रवेश चाचणीत सहभाग घेण्यात यावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा