You are currently viewing एक विसावा

एक विसावा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*एक विसावा* 

***********************

 

दशाक्षरी रचना

(यती ५ व्या अक्षरी..)

 

कुणी कधी ते, कशी कोरली

नात्यां मधली, गोंदण नक्षी

तुझ्या रूपाने, जीवा लाभला

एक विसावा, कोंदण पक्षी ..१

 

घट्ट बांधली, धाग्याची वीण

असे भरोसा,भक्कम पाया

जुळे मनाशी, विचार धारा

विणता खोपा,क्षिणली काया.२

 

प्रेम प्रितीचे,हे तारांगण

मनांगणी या, स्पर्श लाघवी

धुंद जाहली,जीवन यात्रा

तना मनाची, चैत्र पालवी..३

 

हवी आसक्ती, कलागुणांची

कधी प्रेरणा,कधी चेतना

संयम आणि विवेक थोडा

कुणी कुणाला,दिली मंत्रणा .४

 

दूर जाहली,संकट चिंता

मिळे आसरा,तुझ्या पावली

मधुमासाची ,देई चाहूल

आश्वासक ही, तुझी सावली.५

 

**************************

 

©️®️ डॉ मानसी पाटील

प्रतिक्रिया व्यक्त करा