You are currently viewing अभंग शुभेच्छा

अभंग शुभेच्छा

*ज्येष्ठ साहित्यिका, उपक्रमशील आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ता, कथाकार अनुपमा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सदाशिव कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*..

 

*अभंग शुभेच्छा*” 

 

साहित्याची सेवा

अविरत घडावी

अनुपम हस्ते

पांडुरंगा

 

कथा कादंबरी

आणि कविता

विविधतेचा वसा

घेतलासे ..

 

निसर्ग प्रेमाचे

वेड ते वेगळे

प्रतिबिंब त्याचे

साहित्यात् …

 

आनंदाचा दिन

सोहळा आगळा

साजरा तो व्हावा

हर्षभरें …

 

माझ्या शुभेच्छांचा

स्विकार करावा

विनंती आपणां

सदोबाची …

 

 

सदाशिव कुलकर्णी

प्रतिक्रिया व्यक्त करा