You are currently viewing तुझं तुला मिळवायचं आहे

तुझं तुला मिळवायचं आहे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*तुझं तुला मिळवायचं आहे*

 

कुणी न देतो कुणास येथे

अपुल्या हिस्स्याचे असे ते |

जे मिळते सर्वांना स्वेच्छेने

जैसे चिंतन ये फळास ते ||१||

सुख दुःख असेच मिळते

अपुल्या चिंतन विश्वासाने |

कुणी न दुजा जबाबदार

हे फळ मिळते चिंतनाने ||२||

मी त्याला, तिला का बरे दिले

त्याने, तिने मलाच का दिले |

जे समजतो आपण भले

ते कुणी कुणाला सांगा दिले ||३||

साम्य आणि सख्य समदर्शी

मानाचे उपयोगाचे स्वार्थी |

तोलामोलाचे पाहिजे साथी

हे देणे स्वार्थी, नसे निःस्वार्थी ||४||

लक्षात असू द्या एक अट

हे असेच चालते अतूट |

विना खन्त दयावे घ्यावे शांत

अहंकाराशिवाय अतूट ||५||

तू स्वतंत्र निर्विकार होऊनि

सुविचारे सकारात्मक हो |

सर्वोत्तम जे जे हवे तेच

अंतर्मनाने प्राप्त कर्ता हो ||६||

 

कवी :- सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे.

वेंगुर्ला, सिंधुदुर्ग

प्रतिक्रिया व्यक्त करा