*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”पर्जन्य राजा”*
पर्जन्य राजा प्रार्थितो येरे येरे
तुझे स्वागत करितो आम्ही रे ।। धृ।।
तू सकळांचा जल अन्न दाता रे
सृष्टीला सचेतन करणारा रे
पुकारतो आर्ततेने तू बरस रे।।1।।
आयोजिती यज्ञ याग मंदिरात
कोंडविती शंकराला जळांत
वाट पाहतो तुझी चातका परी रे।।2।।
भुंडी धोंडी म्हणत पूजा करतो
बेडकाला स्नान घालून प्रार्थितो
मेघा विनवितो तुला बरसरे।।3।।
श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन. 410201.
Cell.9373811677