You are currently viewing शब्दांनी जीव घेतला…!!

शब्दांनी जीव घेतला…!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*शब्दांनी जीव घेतला…!!*

 

ओघात आवेगात लिहीतांना

शब्दांनी जीव घेतला..

ढिसाळ ओबडंधोबडं शब्दरूपात

भूतांनी नाच केला…

 

वटारलेल्या भेसूर शब्दांनी

घोळसून अर्धमेलं केलं

बोथडं शब्दरचना नाकारून

फेंदारलेलं नाक कापलं..

 

जंगलात चुकलेल्या कोकराला

शब्दप्रयोगांनी गिळून टाकलं

सांधे खिळेठोकून शब्दांना

नादचित्ररूपात भींतीला टांगलं..

 

मनातल्यामनांत शब्दांना नाचवत

पूर्णविरामापाशी येऊन थांबलो

चेह-यामोह-यासह भुतांना आठवत

वेताळतळ्यांत बुडवतं गेलो..

 

ढोरांना बडवल्यासारखं बडवत

शब्दांना झोडपत गेलास

कुठवरं पाप फेडशील

अभिव्यक्तीचं व्याकरण चुकलासं

 

उरला नाही जीव

शब्दांचा जीव घेतलास

काव्य निर्मितीच्या पदन्यासात

लय जगण्याची विसरलास..

उगाचची तुझी बोंबाबोंब

शब्दांनी जीव घेतला…!!

गुलाबस्तवनापोटी तुला असा

जिवंत मोकळा सोडला..!!!!

 

बाबा ठाकूर धन्यवाद

प्रतिक्रिया व्यक्त करा