You are currently viewing जागतिक अंमली पदार्थ दिन

जागतिक अंमली पदार्थ दिन

जागतिक अंमली पदार्थ दिन

जिल्हा पोलीस दलाकडून विविध उपक्रम व “खोड” लघुपटाचे प्रदर्शन

 सिंधुदुर्गनगरी 

जागतिक अंमली पदार्थ दिनाच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाकडून दि 14 ते 30 जून 2024 या कालावधीत अंमली पदार्थ जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. शाळा, कॉलेज व इतर शैक्षणिक संस्थामध्ये पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना मार्गदर्शन करत आहेत. शहरातील बाजारपेठा, मुख्य चौक या ठिकाणी रॅली काढून लोकांना अंमली पदार्थाच्या दुष्परीणामांबाबत माहिती देण्यात येत आहे. निबंध, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येत आहेत. या अभियानात विविध सामाजिक, स्वयंसेवी संस्था, तालुका स्तरावरील प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, प्राध्यापक व विविध उद्योजक यांना सहभागी करुन घेण्यात आले आहे.

या अभियानांतर्गत सिंधुदुर्ग पोलीस दलाकडून “खोड” या  लघुपटाची (short film) निर्मिती  साईनाथ जळवी, साई जळवी फिल्म्स, कुडाळ यांच्याकडून करून घेण्यात आली आहे. या लघुपटाचे प्रदर्शन पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या नियोजनाखाली 25 जून  रोजी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन, सिंधुदुर्ग येथे करण्यात आली.

या समारंभास जिल्हाधिकारी किशोर तावडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनोज जोशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, साई रुप हॉस्पिटल मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रुपेश धुरी, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, दैनिक तरुण भारतचे आवृत्ती प्रमुख शेखर सामंत,  साईनाथ जळवी, साई जळबी फिल्म्स, कुडाळ व त्यांची संपूर्ण टिम, पत्रकार, पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. यावेळी साईनाथ जळवी  व त्यांचे संपूर्ण टिमला प्रशंसापत्रे प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.

आज दि. 26 जून  रोजी अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पोलीस अधीक्षक, यांनी अंमली पदार्थापासून मुक्तीची शपथ सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना दिली व त्यानंतर पोलीस मुख्यालय, जिल्हा होमगार्ड समादेशक कार्यालय, सिंधुदुर्ग, पोलीस भरतीची सर्व मैदाने, पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्ग इत्यादी परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

अंमली पदार्थाविरोधी जनजागृती करण्याच्या उद्देशाने सर्व शाळा, कॉलेज इतर शैक्षणिक संस्था, चित्रपटगृह, प्रसार माध्यमे यांनी “खोड” हा लघुपट सर्व विद्यार्थी, पालक व नागरीकांपर्यंत पोहचविण्याचे तसेच सिंधुदुर्ग पोलीस दलासोबत या अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी केलेले आहे.

“खोड” हा लघुपट खालील लिंकवर उपलब्ध आहे.

सिंधुदुर्ग पोलीस फेसबुक पेज लिंक, https://www.facebook.com/share/v/ogssUmtqNkHDG5Uo/
सिंधुदुर्ग पोलीस ट्विटर हॅन्डल लिंक, https://twitter.com/Sindhudurg_SP/status/1805918677306311087
SAIJALVI FILNS युटयुब लिंक, https://youtu.be/6IP5HJFmUhQ?feature=shared

 

प्रतिक्रिया व्यक्त करा