You are currently viewing उद्या २७ जून रोजी शिवाजी विद्यालय हिर्लोक येथे बहुविध कौशल्य अभ्यासक्रमाचा उद्घाटन समारंभ

उद्या २७ जून रोजी शिवाजी विद्यालय हिर्लोक येथे बहुविध कौशल्य अभ्यासक्रमाचा उद्घाटन समारंभ

कुडाळ :

 

शिवाजी विद्यालय हिर्लोक येथे कॉज टू कनेक्ट पुणे, भागीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान झाराप व हिर्लोक पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ हिर्लोक यांचे संयुक्त विद्यमाने बहुविध कौशल्य अभ्यासक्रमाचा उद्घाटन समारंभ गुरुवार दिनांक २७ जून २०२४ रोजी दुपारी ठीक २.०० वाजता श्रीमती कविता शिंपी मॅडम (शिक्षणाधिकारी जि. प. प्राथ. सिंधुदुर्ग) यांच्या शुभहस्ते होणार आहे.

या कार्यक्रमाला श्री उदय लवू सावंत (अध्यक्ष हिर्लोक पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ हिर्लोक) उद्घाटक म्हणून लाभले आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. गणपती कमळकर (शिक्षणाधिकारी जि. प. प्राथ. सिंधुदुर्ग), श्री प्रदीपकुमार कुडाळकर (शिक्षणाधिकारी योजना जि. प. माध्यमिक सिंधुदुर्ग), श्री अनिरुद्ध बनसोड (संस्थापक कॉज टू कनेक्ट फाउंडेशन) डॉ. प्रसाद देवधर (भागीरथ प्रतिष्ठान, झाराप), श्रीम. दिपाली खैरमोडे (प्रोग्रॅम ऑफिसर कॉज कनेक्टर फाउंडेशन) श्रीम. गौरी दळवी (प्रोजेक्ट कॉर्डिनेटर कॉज टू कनेक्ट फाउंडेशन) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कॉज टू कनेक्ट या संस्थेचा उगम या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना व्यावहारिक व कौशल्यपूर्ण बनवण्यासाठी प्रयत्न केला जातो. या उपक्रमाचे कार्यशाळा व अभियांत्रिकी तंत्रज्ञान, ऊर्जा व पर्यावरण, बागकाम आणि शेतीकाम, अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान हे चार विभाग आहेत. विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्याचा विकास होणे हा उपक्रम राबवण्यामागचा एकमेव हेतू आहे.

तेव्हा या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन सर्व संस्था संचालक, सदस्य, मुख्याध्यापक दिनेश म्हाडगुत सर, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थांनी केले आहे.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा