You are currently viewing सार जीवनाचा…

सार जीवनाचा…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी शशांक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*सार जीवनाचा…*

 

चिंतारहीत थोडे

घ्यावे जगून काही…

स्वच्छंद पाखरासम

घ्यावे उडून काही…

 

उड्डाण गगनचुंबी

घेता! अवश्य घ्या, पण…

जमिनीस पाय राहो

घ्यावे कळून काही…

 

स्वबळावरी अशी ती

राहील भिस्त ज्याची…

होणार त्या जिवाचे

आयुष्य छान काही…

 

रडरड करून नुसते

हरणार संकटे ना…

बेधुंद होत थोडे

घ्यावे चलून काही…

 

नैराश्य दुःख पीडा

अवचित छळेल केंव्हा…

देऊन बगल त्याना

व्हावे अजाण काही…

 

शंका भिती भयाला

थारा नकोच केंव्हा…

सामोर संकटांच्या

व्हावे मतीन काही…

 

धावेत माणसाचे

जाते सरून जीवन…

काढून वेळ थोडा

घ्यावे हसून काही…

 

भवितव्य ते उद्याचे

असतेच ठाव कोणां?..

निर्मळ सुशील सुंदर

घ्यावे फुलून काही…

 

अविचार द्वेष इर्षा

राहो मनी कधी ना…

झटकून भेद सगळे,

व्हावे करूण काही…

 

(मतीन= मजबूत/कणखर)

 

✍️शशांक दिनकरराव देशमुख

चांदुरबाजार, जि. अमरावती

(महाराष्ट्र राज्य) – ४४४ ७०४

मो.क्र. ९९२३५३६३२५

प्रतिक्रिया व्यक्त करा