*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वळीवाचा पाऊस*
असा अवचित
वळीवाचा पाऊस येतो
हळूच बिलगतो
भिजवत ….
उन्हातच अचानक
मेघ जमतात श्यामल
थेंब सजल
पावसाचे….
सुटतो वारा
लगबगीने वाट चालता
त्रेधातिरपीट उडता
अवचित….
निथळतं पाणी
टिपटिपतं हिरव्या पानावरून
मृद्गंध दरवळून
येतो…
.
भिजतो रस्ता
ओली घरे कौलारू
मिटतं पाखरू
पंख…..
भिजलेली सृष्टी
सोनेरी उन्हात गारवा
मनाला हवा
वाटतो….
आयुष्यात वळीव
असाच बरसून जातो
ऊनसावलीचा खेळतो
लपंडाव……!!
🌿🌷💦🌿🍃💦🌿🌷
अरुणा दुद्दलवार @✍️