You are currently viewing माझे गाव कापडणे…

माझे गाव कापडणे…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

*माझे गाव कापडणे…*

लहानपणी भल्यापहाटे कधी जाग येत नाही
पण मला कधी कधी जाग येऊन मी अतिशय
घाबरायचे ते पहाटे पहाटे हातात कंदिल घेऊन
घोंगडे पांघरलेला कुणी तरी माणूस रस्त्याने टिंग टिंग अशी घंटी वाजवत एकटाच सुनसान
रस्त्यावरून धिमी धिमी पावले टाकत जात असायचा.काळोख्या रात्रीत अचानक त्याच्या घंटीचा आवाज येऊन डोळे उघडताच तो दृष्टीस पडे व भीतीने माझी पाचावर धारण बसे. मी गच्च डोळे मिटून तो जायची वाट बघत
पडून राही.ह्या गोष्टीची एवढी भीती मनात बसली होती की, अजूनही ते दृश्य डोळ्यांसमोर
तसेच्या तसे दिसते. भल्या पहाटे हा पिंगळा असा रस्त्यावरून का जात असे हे कोडे अजूनही मला उलगडले नाही.एवढ्या पहाटे कोण त्याला भिक्षा देईल? तो उतरायचा तो
दर्ज्या जवळील धर्मशाळेत, दिवसाही तो तिथे
दिसला की मला भीती वाटायची. बरेच दिवस
मुक्काम करून तो पुढे जात असे. अजूनही माझ्या मनात प्रश्न आहे की नक्की त्याचा व्यवसाय काय होता? असो. अशा एकेक गोष्टी, बालपणीच्या, मनात घर करून असतात.त्या मनावरून कधीही पुसल्या जात
नाही हे ही तेवढेच खरे आहे.आता खेड्यातून
पिंगळा येतो की नाही मला माहित नाही पण
माझ्या मन:चक्षुंसमोर मात्र तो कायमचा आहे.

काही काही येणारे मात्र आनंद देणारे होते त्यांची आम्ही आतुरतेने वाट पहात असू. अगदी
सकाळी सकाळी मोरपिसांची दाट टोपी व हातात चिपळ्या घेऊन वाजवत गिरक्या घेत
येणारा प्रसन्न चेहऱ्याचा वासुदेव मात्र नजरेसमोरून हटत नाही. आमचा पाच सहा भाऊबंदांचा अर्धगोलाकृती असा वाडा आहे. आम्ही लहान असतांनाचे वाड्याचे वैभव आता
लुप्त झाले आहे.प्रवेशाला एक मोठी मोकळी जागा फक्त नि बाजुने आमची सहासात घरे..
ओटा ही सलग, अगदी ह्या टोकापासून त्या टोका पर्यंत पळत जाता येईल असा.शेवया करायला १२/१५ पाटांवर बायका एकाच वेळी
बसू शकत इतका मोठा. सात/आठ खाटा व प्रत्येक खाटेवर तीन तीन बायका बसत.निदान
दोन तर नक्कीच.खूप मजा यायची शेवयांच्या
दिवसात. रोज आळीपाळीने कुणाच्या तरी शेवया असत. बाकी सगळी टीम तिच असे.

तर अशा या वाड्यात हे बहुरूपी खूप येत असत. वासुदेव, कवड्यांच्या माळा व देवीचे
फोटो छातीवर घेऊन संबळ डफ वाजवणारे व
बोटांच्या खुणांवरून नावे ओळखणारे असे मनोरंजन करत पोटासाठी मागणारे वाड्यात
खूप रेंगाळत असत.चिपळ्या वाजवत वासुदेव
गिरक्या घेत गाणी म्हणायचा व मोठ्याने..
ललकारी मारायचा..”सुंदराबाईच्या नावाने होऽऽऽ करत, …..

“दान दिलं हो सुंदरा बाईने,
. .सीताराम सासऱ्याच्या नावाने”

असे म्हणत आईने सुपात दिलेले दाणे गिरक्या
मारीत सुप फिरवत तो छुनूछुनू नाचायचा व वाड-वडिलांचा उद्धार करायचा व तिथेच लगेचच पुढच्या दारात जाऊन उभा रहायचा.अशी एकदम ५/६ घरातच त्याची झोळी भरून जायची.तोच लगेच दोनचार दिवसातच कवड्यांची माळवाले मांडीवरील संबळ छोट्या वाकड्या काड्यांनी एक पाय टाच वर
करत मोठ्याने गाणे म्हणत दाराशी हसतमुख
उभे रहायचे.आईला वाडवडिलांची नावे विचारून पलिकडे दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या आपल्या सवंगड्याला बोटांच्या खुणांनी सांकेतिक भाषेत नावे सांगायचा तेव्हा
वाड्यातली सारी घराघरातली माणसे दारात
येऊन कौतुकाने गंमत बघत असत. तो सवंगडी
बोटांच्या खुणा ओळखून मोठ्याने सीताराम पाटलानं होऽऽऽ म्हणताच आम्हाला मोठे नवल
वाटायचे. अरे! ह्याने कसे ओळखले बरोबर? ती
त्यांची सांकेतिक भाषा होती हे कळायचे तेव्हा
वय नव्हते.

खेड्यापाड्यातून असे मनोरंजन करणारे व पोट
भरणारे खूप लोक त्यावेळी येत असत.त्यांचे पोट भरे व गावाचे मनोरंजन होई. व्यवसाय करणारे तर दिवसभर येत असत. त्यात मघाशी
सांगितल्याप्रमाणे सुयावाले, रोमडीवाले व मोतीवालेही येत असत. मला आठवते, डोक्याला टाईट रंगीत फेटा चापूनचोपून बसवलेला, कोट घातलेला नीट नेटका असा
एक शिख माणूस हातात चामड्याची छानशी
बॅग छातीशी सांभाळत, मोठ्याने..” खरे मोती घ्या, कलचर मोती घ्या”म्हणत जात असे. आईचे लक्ष असे. दुपारची वेळ, कामे आटोपलेली असत. आई म्हणायची,” बलाव वं
बाई त्याले” म्हणताच पळत जाऊन मी त्याला
हाका मारायची व तो ओट्यावर येऊन बसायचा. मग आई पदर सावरत अदबीने थोड्या अंतरावर बसताच तो मस्त पातळ मुलायम कागदात बांधलेले मोत्याचे नाजुक
नाजुक प्रकार एकएक करून आईला हळूवारपणे दाखवायचा. मला आता ही ते छोटे
छोटे बारीक असे वेगवेगळ्या आकाराचे सुंदर
पाणीदार मोती दिसताहेत डोळ्यांसमोर.

मला काय फारसे कळत नव्हतेच, मी लगेच
खेळायला पळत असे. आईची मात्र मोत्यांची
खरेदी होत असे. मग एक दिवस हळूच सोनार घरी येई. (आई कधी दुकानात जात नसे)सगळे
बोलावले की घरी येत असत. अगदी कपड्यांचे
तागे सुद्धा दाखवायला घरी येत असत. सोनार
आला की आई, कागदातले मोती अलगद समोर ठेवी. आणि मग सोन्यात त्यांचे कानातले
नाकातले दागिने कुड्या बनत असत.हे मोती खरोखर त्यावेळी अस्सल मिळत असत. कारण
आईने वर्षानुवर्षे वापरूनही ते कधी खराब झाले नाही असे मला आठवते.एकूणच खेड्यातले त्यावेळचे जीवन छान होते असे मला आतातरी वाटते. कुणी कुणाच्या भानगडीत नव्हते. जो तो आपापल्या कामात
असे.शांत संयत असे ते जीवन होते.जास्त हावरटपणा नव्हता. समाधान होते.

त्याकाळी समाजात बुवाबाजीचे फार प्रस्थ होते. शिक्षणाचा प्रसार व प्रचार कमी होता.
त्यामुळे हात दाखवणे, भविष्य बघणे, पोपटवाले, भगत भगतीण यांची प्रचंड चलती
होती.मला आठवते, मी आठनऊ वर्षांची असेल
कदाचित तेव्हा, मुरलीधर अण्णाच्या ओट्यावर
एका दाढीधारी साधूचा चांगला आठदिवस मुक्काम होता. व आठ दिवस सर्व गल्ली बाबाजवळ जाऊन बसत होती व भविष्य बघत
होती. ज्या बाबाला पोटासाठी याच्या त्याच्या
ओट्यावर मुक्काम करावा लागत होता तो इतरांचे भविष्य बघणार? पण जमानाच तसा होता कोण काय करणार? त्या बाबाकडे दिवसभर झुंडीच्याझुंडी जात होत्या. त्यानंतर
त्याचा मुक्काम दुसऱ्या गल्लीत हलला होता.
कोणते मानसिक समाधान लोकांना मिळत होते माहित नाही.पण मिळत असणार हे नक्की! शेवटी माणूस कुठेतरी समाधान शोधण्याचा प्रयत्न करत असतो हेच खरे आहे.

तुम्हाला ऐकूनच मजा वाटेल अशी गंमत सांगते. आमच्या गावात सरकारी दवाखाना होता बरं. अगदी डॅा.ही तिथे आत बसलेले असायचे. मी कधीकाळी पाहुणे आले की त्यांना घेऊन जात असे. हे डॅा.धुळ्याहून येत.
त्यांचे घर धुळ्याला बदली मात्र कापडण्याला.
काही जण फॅमिली घेऊन येत व रहात असत.अशातले असे एक डॅा.जोशी फॅमिलीसह रहात, त्यांच्या गोड गळ्याच्या मुली
आमच्याच शाळेत होत्या त्या गॅदरिंगला छान
गाणे म्हणत असत.
पण काही डॅा.दररोज अपडाऊनही करत असत.
मग डॅा.नसत त्यावेळी आमचा भाऊराव कंपाऊंडरच दवाखाना चालवत असे. आता त्याने कितपत ट्रेनिंग घेतले होते माहित नाही
पण रूग्ण दवाखान्यात गेला रे गेला की तो लगेच इंजेक्शन देत असे व पैसे घेत असे. लोकही आनंदाने देत व गुण आला बरं भाऊ असे सांगत असत. भाऊरावची अशी खूप चलती होती गावात असे म्हणतात. (तेव्हा मी लहान होते ना? ) तरी
भाऊराव कंपाऊंडर गल्लीतून फिरतांना दिसतो.
बायका म्हणत,” एक इलक्सन दि दे ना भाऊ!”
भाऊराव सरळ डिस्ट्रिल वॅाटर टोचत असे. इंजेक्शन घेतले आहे या समाधानात रूग्ण बरा
होऊन जाई.भाऊराव सतत हसतमुख व गोडबोल्या होता हे मात्र खरे. ह्या इंजेक्शनवर
त्या काळात त्याने बरीच माया जमवली होती
असे म्हणतात. नंतर मी धुळ्याला शिकायला गेल्यामुळे संपर्कच तुटला. असे एकेक नमुने व
गमतीजमती असतात गावात. डॅा.उपलब्ध नसेल तर सोनगीरचे एक जुने डॅा. मेंढी म्हणून
होते, वडील आमच्यासाठी त्यांना बोलवत व ते ही तांग्यातून थेट आमच्या घरी येत. हो.. बोलावणे भाऊंच्या घरचे असे ना? माझ्यासाठीही ते आलेले मला आठवतात. वयस्कर असे छान पर्सनॅलिटी असलेले गोरेपान पांढऱ्या केसांचे असे डॅा.मेंढी होते.

आणखी एक प्रस्थ खेड्यात यायचे ते म्हणजे
बहुरूपी व भाट.हे भाट स्तुतीपर गाणी म्हणत
व त्यांच्या चोपडीत आपल्या अनेक पिढ्यांचा
इतिहास आपल्या पुर्वजांच्या नावासह लिहिलेला बघायला मिळत असे. ते तासंतास
बसून तो आपल्याला दाखवत व नवा लिहून घेत असत. तसेच बहुरूपी ही करमणूक करत
असत. ते वेष बदलून हुबेहूब कुणाचेही सोंग
वठवत असत. अकबराच्या दरबारी एका बहुरूप्याने बैलाचे उभेहूब सोंग वठवताच
बिरबलाने त्याच्या पाठीवर खडा फेकला व
बहुरूप्याने हुबेहूब त्या जागेवर थरथर दाखवल्याचे आपण वाचले आहे, असे हे बहुरूपी खरोखर सोंग वठवण्यात पटाईत असत. शिवरायांच्या काळात गुप्त हेरांना असे
बहुरूपी बनूनच वावरावे लागत असे. तेव्हाच ते
बेमालूमपणे हेरगिरी करू शकत असत.जसा
देश तसा वेष व जसा काळ तसा माणूस हेच
खरे आहे म्हणायचे. तुमच्याही डोळ्यांसमोर
सारे आलेच असेल ना?…

बरंय् मंडळी, येते आता, पुढच्या रविवारी..

जयहिंद.. जय महाराष्ट्र…

आपलीच,

प्रा.सौ.सुमती पवार.नाशिक
(९७६३६०५६४२)

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*

संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*

*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…

*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/136519/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा