You are currently viewing जामसंडे येथे मुलाकडून वडिलांवर सुऱ्याने प्राणघातक हल्ला….

जामसंडे येथे मुलाकडून वडिलांवर सुऱ्याने प्राणघातक हल्ला….

जामसंडे येथे मुलाकडून वडिलांवर सुऱ्याने प्राणघातक हल्ला….

कुत्र्याला खायला आणायला सांगितल्याने वाद…

देवगड

कुत्र्याला खाद्य आणण्यासाठी सांगितल्या रागातून मुलाने वडीलांवर सुऱ्याने हल्ला केल्याचा प्रकार जामसंडे सहकारनगर येथे घडला आहे. यात वडील रविकांत पारकर (वय ६४) हे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुलगा करण पारकर (वय ३१) याच्यावर देवगड पोलिसांत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामसंडे-सहकारनगर येथे राहत असलेल्या रविकांत रघुनाथ पारकर यांचा लहान मुलगा करण पारकर यांने कुत्र्यांना खाण्यासाठी कोंबडीचे पाय आणायचे आहेत ते घेऊन ये असे मोठा भाऊ सिद्धार्थ याला सांगितले. परंतु त्यांने ते संध्याकाळी घेऊन येतो, असे सांगितल्यावर त्याचा राग येऊन करण याने घरातील सर्वांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. व वडील रविकांत पारकर यांना हाताच्या थापटाने मारून नंतर घरातील मासे कापण्याचा सुरा घेऊन त्याने डाव्या हातावर व पाठीवर वार करून जखमी केले. या प्रकरणी रविकांत पारकर यांनी देवगड पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी करण पारकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान आज त्याला येथील न्यायालयात हजर केले असता १५ दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल उदय शिरगावकर करीत आहेत.

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*‌प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….प्रवेश सुरू…….*

*शिक्षणासोबत नोकरीची हमी* *फक्त*!!!!

*👉दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,*👩‍⚕👩‍⚕

*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता….(ऍडमिशन) प्रवेश* *सुरु आहे*.
https://sanwadmedia.com/137740/

*दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,* रत्नागिरी येथे १२ वी उत्तीर्ण रत्नागिरीतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याकरिता सुवर्ण संधी.
खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु.
*▪️B.Sc Nursing*
*▪️Post Basic B.Sc Nursing*
*▪️M.Sc Nursing*
*▪️GNM*
*▪️ANM*

_अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित हॉस्पिटल मध्ये १००% नोकरीची हमी, तसेच परदेशात सुद्धा काम करण्याची सुवर्ण संधी._

_राज्य सरकारच्या नियमानुसार शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध तसेच मर्यादित विद्यार्थ्यांना खाजगी संस्था कडून शिष्यवृत्ती चा लाभ._

_प्रवेश निश्चित करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा._
*📲८६००३०२४५४*
*📲९४२३२९१८६३*
*📲८८३०७८९५७०*

*प्रवेशासाठी अधिक माहितीकरिता खालील लिंक क्लिक करून आपली माहिती सादर करा.*

https://forms.gle/4i3u6hNgVriV7Msr7

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137740/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा