You are currently viewing निगुडे गावातील वीज समस्या तात्काळ मार्गी लावा…

निगुडे गावातील वीज समस्या तात्काळ मार्गी लावा…

निगुडे गावातील वीज समस्या तात्काळ मार्गी लावा…

अन्यथा दोन दिवसात बांदा कार्यालयावर धडक मोर्चा: सरपंचांसह ग्रामस्थांचा इशारा..

बांदा

निगुडे गावात गेले कित्येक दिवस विजेचा लपंडाव सुरू असून जिकडे तिकडे विजेच्या तारा तुटून विद्युत पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे दोन दिवसात गावातील वीज समस्या मार्गी लावा, अन्यथा वीज कार्यालयावर धडक देऊ असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.दरम्यान विजेच्या तारावर झाडंझुडूपं व वेलींनी विळखा घातला आहे तसेच ब-याच ठिकाणी विद्युत खांब कोलमडले असून काही खांबांना गंज लागून तुटून पडण्याच्या स्थितीत आहेत ही बाब शाखा उप अभियंता यांना लेखी निवेदने दिलेली असून वस्तुस्थितिही दाखवून दिली आहे त्यामुळे तात्काळ हे सर्व प्रश्न मार्गी लावा असेही ग्रामस्थांनी यावेळी आपल्या पत्रकात सांगितले.

ते माहणाले खांब बदलण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नाही.फक्त आश्वासन दिली जातात पण कृतीत आणले जात नाही. त्यामुळे निगुडे गावातील वायरमन ट्रिट लाईन दुरुस्ती करताना विजेचा शॉक लागून मरता मरता वाचला आहे. शासन भारनियमन करून विधुत बचत करत आहे असे असताना निगुडे गावातील ट्रिट लाईट गेले ५/६ दिवस २४ तास सुरू आहे याकडे कोणताही कर्मचारी/अधिकारी लक्ष देत नाही किंवा लाईट मधिल झालेला बिघाड दुरुस्ती करत नाही. त्यामुळे गावातील लोकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. हा बिघाड व समस्यांची एक/दोन दिवसांत पुर्तता न केल्यास विद्युत महामंडळाच्या बांदा कार्यालयावर अचानक धडक मोर्चा काढण्याचा इशारा निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर आणि निगुडे ग्रामस्थानी दिला आहे..

प्रतिक्रिया व्यक्त करा