You are currently viewing स्मृति भाग ७३

स्मृति भाग ७३

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग ७३*  

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

१) गुरुजनांची भेट झाल्यावर रोज त्यांचा चरणस्पर्श करावा .

२) प्रवासास जावून आल्यावर घरातील सर्व मोठ्यांचा ( आई , वडिल , बन्धु , भगिनी , गुरु व अन्य मोठी माणसे ) नमस्कार करावा .

३) ऋत्विक् , सासरा , काका , मामा हे वयाने लहान असतील तर फक्त उठून उभे रहावे , नमस्कार करु नये .

४) आपल्या नगरातील प्रत्येक मोठी व्यक्ति प्रत्युत्थानास योग्य आहे .

५)वित्तवान , बन्धु ( मोठा ) , कर्मवयस्क , जातिने मोठा , विद्यावान व वयाने मोठा , हे सर्व मानाचे आहेत . श्रृतधर्म व श्रृतिमूल ज्यांचे आहेत ते महानच आहेत .

६) रस्त्याने चालतांना रथवान् , वयाने नव्वदी पुढील , दयेस पात्र असणारा , वधू , स्नातक , आणि राजा यांना मार्ग द्यावा .

७) राजाने श्रोत्रियाससुद्धा मार्ग द्यावा .

 

या सर्व गोष्टी गृहस्थाश्रम कर्तव्य वर्णनात येतात . ” मार्ग द्यावा ” यावरुन सहज आठवले ते सांगतो . पूर्वीचे काळी ऋषि आश्रमात शिकणार्‍या मुलाने जरि राजास एखादी चुकीची कृती करतांना रोकले वा थांबवले तर राजालासुद्धा त्या मुलाचे ऐकावे लागे . हा नियम होता व तो आजही स्तुति करण्यालायकच आहे . अन्यथा तो राजा ऋषिंकडून दण्डास पात्र रहायचा . हे उच्च कोटीचे वर्तन , ज्याला इंग्रजाळलेले एटिकेटस् म्हणतात , ते भारतात होते . आजकालचे काही नालायक राजकारणी व त्यांची उलट्या खोपडीची संताने पाहिली वा विद्याविभूषित वा वित्तवंत आणि त्यांचे गावंढळ पुत्रप्रेम पाहिले की नवीन सुधारणा करणारांची वा वर्तणुकीची लाजच वाटते. बिघडलेल्या मुलांना प्रेमाने गोंजारणारी मोठी माणसे पाहिली की विज्ञान युगातील घटनांची व कायदे पण्डितांची ही लाज वाटते .

उद्या आपद्धर्मवर्णन पाहू .

तशा सर्वच स्मृति वाचनीयच आहेत , चिंतनीय आहेत , मननीय आहेत आणि प्रवचनीय ही आहेत . वाचाल ना स्मृति ? 🙏🙏

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२११

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा