You are currently viewing सिंधुदुर्ग वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार यशवंत तांबे यांचे अपघाती निधन…

सिंधुदुर्ग वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार यशवंत तांबे यांचे अपघाती निधन…

सिंधुदुर्ग वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार यशवंत तांबे यांचे अपघाती निधन…

महामार्गावर पियाळी नदी पुलावरील घटना; अन्य दोघे गंभीर जखमी…

कणकवली

मुंबई-गोवा महामार्गावर असलदे पियाळी नदी पूलावरील दुभाजकातील संरक्षक कठड्याला चार चाकी कारची जोरदार धडक बसली. या अपघातात सिंधुदुर्ग महामार्ग वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार यशवंत उर्फ अभी भास्कर तांबे जागीच ठार झाले. तर इतर दोघे जखमी झाले. ही धडक इतकी भीषण होती की, अपघातानतंर गाडीच्या पूढील भागाचा चुराडा झाला. ही घटना शनिवारी पहाटे ३:१५ च्या सुमारास घडला.

मुंबई-गोवा महामार्गावरून कणकवली ते वैभववाडीच्या दिशेने आपल्या ताब्यातील कार घेऊन जाणारे सिंधुदुर्ग वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस हवालदार जाणारे यशवंत भास्कर तांबे (वय ३५, रा. वैभववाडी) व आणखी दोघेजण जात असताना नांदगाव नजीक असणाऱ्या असलदे पियाळी नदीच्या पूलावर आले असता पुलाच्या संरक्षक कठड्यावर कार आदळत अपघात घडला. अपघात एवढा भीषण होता की, गाडीच्या पूढील भागाचा चक्काचूर होत एअर बॅग खुल्या झाल्या.

या भीषण अपघातात यशवंत उर्फ अभी तांबे जाणीच ठार झाले. तर इतर दोघांमधील एक जण जखमी असून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहीती मिळताच सिंधुदुर्ग वाहतूक पोलीस, कणकवली पोलीस व स्थानिकांनी धाव घेत मदतकार्य केले. अपघातानतंर काहीकाळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. वैभववाडीसह, जिल्हात मोठा मित्रपरिवार असणारा नेहमी हसतमुख व्यक्तिमत्व क्रिकेटपटू यशवंत उर्फ अभी तांबे याच्या अकाली अपघाती निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

*संवाद मिडिया*

🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀

*BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025 सुरू*

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी*.
एस.एन.डी. टी. महिला विद्यापीठ संलग्न

*BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025*

बारावीनंतर बीसीए डिग्री कोर्स 2024-25 ऍडमिशन करिता आजच आपली नोंदणी खाली दिलेल्या लिंक वरती करावी .

https://forms.gle/3MAKqpBiCSpKYmB5A

कोणत्याही शाखेच्या( आर्ट्स /कॉमर्स/ सायन्स) , गणित किंवा गणित विषया शिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना येथे प्रवेश मिळू शकतो.

*अधिक माहितीसाठी* 👇
*📲7972997567*
*📲9420274119*

या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष भेट द्यावी.

*पत्ता: महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी,साखरतर रोड, शिरगाव ,रत्नागिरी.*

*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138548/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा