*केंद्रशाळा शेर्पेमध्ये सेवा सहयोग संस्था मुंबईने केले दप्तरांचे वाटप*
कणकवली
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा शेर्पे तालुका कणकवली या शाळेला शाळेच्या पहिल्याच दिवशी
सेवा सहयोग संस्था मुंबई च्या वतीने शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या 51 विद्यार्थ्यांना व शेर्पे हायस्कूल मधील केंद्रशाळा शेर्पे इयत्ता आठवी मध्ये गेलेल्या 7 विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले .
शाळा प्रवेशोत्सव , दप्तर व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर स्मिता पांचाळ – सरपंच शेर्पे, सिराज – मुजावर -उपसरपंच शेर्पे,निशा गुरव -माजी सरपंच शेर्पे,ग्रामपंचायत सदस्य – चंद्रकांत शेलार ,शितल कांबळे ,तंटामुक्त समिती अध्यक्ष -चंद्रकांत कांबळे,पोलीस पाटील – विनोद शेलार ‘शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष -सत्यविजय शेलार,मुख्याध्यापक – दशरथ शिंगारे ,शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष -महेंद्र शेलार, माता पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष – सिद्धी शेलार ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य स्वरा पाटणे ,जानवी सावंत ,मंगेश कांबळे, साक्षी तेली, विलास पांचाळ ,रजिया जैतापकर . प्रतिष्ठित ग्रामस्थ दत्ताराम शेलारआदी उपस्थित होते .
सेवा सहयोग संस्थेच्या माध्यमातून केंद्रशाळा शेर्पेला सलग दोन वर्ष विद्यार्थ्यांना दप्तर व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येत असल्यामुळे सर्व उपस्थित मान्यवरांनी सेवा सहयोग संस्थेच्या कार्याला मनःपूर्वक धन्यवाद दिले .तसेच सेवा संयोग संस्थेचे मान . अध्यक्ष यांचे आभार व्यक्त केले .सेवा सहयोग संस्थां मुंबई कडे केंद्रशाळा शेर्पेला सदरची देणगी मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्याकरिता केंद्रशाळा शेर्पेचे माजी विद्यार्थी – ज्योती तेली ,दीपक रांबाडे व त्यांचा मैत्री ग्रुप केंद्रशाळा शेर्पे इयत्ता सातवी – १९९४ बॅचच्या त्यांच्या सहकाऱ्यांनीही शाळेला दप्तर व शैक्षणिक साहित्य मिळवण्यासाठी पाठपुरावा व शाळा सरापर्यंत साहित्य पोहोचवण्यासाठी योगदान दिलेले आहे .त्यांना सुद्धा उपस्थित मान्यवरांनी धन्यवाद दिले .
सदरचा कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक -अमरीन शेख , मोहिनी पाटील ,योगिता बंडगर व सर्व विद्यार्थी यांनी विशेष मेहनत घेतली .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन -अमरीन शेख तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन दशरथ शिंगारे यांनी केले .
*संवाद मिडिया*
👗👗👗👗👗👗👗👗👗
*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*
*𝙼𝚊𝚔𝚎 𝚢𝚘𝚞𝚛 𝙿𝚊𝚜𝚜𝚒𝚘𝚗 𝚈𝚘𝚞𝚛 𝙿𝚛𝚘𝚏𝚎𝚜𝚜𝚒𝚘𝚗…*
*𝙲𝚊𝚛𝚎𝚎𝚛 𝚒𝚗 𝙵𝚊𝚜𝚑𝚒𝚘𝚗 𝙳𝚎𝚜𝚒𝚐𝚗𝚒𝚗𝚐…*
👗👗👗👗👗👗👗👗👗
*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*
*𝙳𝚒𝚙𝚕𝚘𝚖𝚊 𝚒𝚗 𝚃𝚎𝚡𝚝𝚒𝚕𝚎 & Fashion Designing*
(SNDT विद्यापीठ, मुंबई मान्यताप्राप्त अभ्यासक्रम)
🔸कालावधी :- २ वर्षे
🔸 प्रथम वर्षाकरीता प्रवेश पात्रता :-कोणत्याही शाखेची १२ वी परीक्षा उत्तीर्ण.
🔸 *वैशिष्ट्ये :-*
✅ तज्ञ व अनुभवी अध्यापक वर्ग.
✅ अद्ययावत फॅशन व टेक्स्टाईल लॅब.
✅ फॅशन इंडस्ट्रीतील नामांकित कंपन्यांमध्ये क्षेत्र भेटी.
✅ सर्व सोयींनी युक्त वसतिगृह व मेस सुविधा उपलब्ध.
✅ डिप्लोमा नंतर डिग्री अभ्यासक्रमास प्रवेशास पात्र.
✅ नामांकित फॅशन कंपन्या मध्ये नोकरीच्या अधिक संधी अथवा स्वतःचा स्टार्टअप व्यवसायास उपयुक्त.
*संपर्क:*
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*,
अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करावा:
📱 74998 21369
कृपया पुढील Google form भरावा :
https://forms.gle/k5HygsNxeUTTMJmb7
*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138545/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*