सावंतवाडी :
सावंतवाडी नगरपालिका आणि लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज सावंतवाडी येथे एक आगळावेगळा असा कार्यक्रम पार पडला. यावेळी भारतीय सेनेच्या सर्वोच्च सन्मान परमवीर चक्र सन्मानाने सन्मानित परमवीर चक्र विजेता सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन योगेंद्रसिंग यादव यांनी शालेय विद्यार्थ्यांना आपल्या युद्धातील प्रत्यक्ष अनुभव सांगितले त्यांचे अनुभव ऐकत असताना प्रत्येक विद्यार्थ्याला मनातून आपण कारगिल युद्धात सहभागी झाल्याचे व प्रत्यक्ष त्या रणांगणामध्ये उपस्थित असल्याची अनुभूती मिळाली.
राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी विशेषता कळसुलकर इंग्लिश स्कूल आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय चा एन.सी.सी पथक या ठिकाणी उपस्थिती दर्शवली व आपल्या पुढील आयुष्यामध्ये सेनेत दाखल होण्यासाठी आजपासून तयारी करण्याची इच्छा दाखवली योगेंद्रसिंग यांनी सुद्धा या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व फक्त सैनिक बनून देशसेवा करता येते असे नाही तर देशाचा एक चांगला नागरिक हा सुद्धा खरा देश सेवक असतो हा सल्ला दिला.
यावेळी प्रशालेचे एनसीसी अधिकारी फर्स्ट ऑफिसर गोपाळ गवस हेही उपस्थित होते. माजी सैनिक संघटना विविध संघटनांनी तसेच सावंतवाडीतील विद्यालय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली.